CoronaVirus News: आता सलून, ब्युटी पार्लर्सदेखील सुरू करण्याचा राज्य सरकारचा विचार; हालचालींना वेग
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2020 09:38 PM2020-05-27T21:38:43+5:302020-05-27T22:13:08+5:30
ठाकरे सरकारचा निर्णय घेण्याच्या तयारीत; लवकरच नव्या नियमाची अंमलबजावणी होण्याची शक्यता
मुंबई: मोदी सरकारनं लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात विविध दुकानं आणि सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आता ठाकरे सरकारनंदेखील अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी हळूहळू निर्बंध शिथिल करण्याच्या दृष्टीनं पावलं टाकण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील सलून आणि ब्युटी पार्लर सुरू करण्याचा विचार राज्य सरकारकडून सुरू आहे. परवापासून म्हणजेच २९ मेपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू होण्याची शक्यता आहे.
राज्य सरकारनं मद्यविक्रीला परवानगी दिली, त्यावेळीच सलून आणि ब्युटी पार्लर सुरू करण्याची मागणी सुरू झाली. मात्र गर्दी होईल म्हणून राज्य सरकारनं याबद्दलचा निर्णय अद्याप घेतलेला नाही. मात्र आता २९ मेपासून राज्यातील सलून आणि पार्लर सुरू होण्याची शक्यता आहे. सलून आणि पार्लर्स सुरू करताना चालकांना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या वेळेतच सलून आणि पार्लर्स सुरू ठेवण्याची परवानगी असेल. सलून, पार्लर्समध्ये ग्राहकांना थेट येता येणार नाही. त्यांना त्यासाठी अपॉईंटमेंट घ्यावी लागेल. या ठिकाणी केवळ अत्यावश्यक सेवा (हेअर कट, हेअर डाय, वॅक्सिंग, थ्रेंडिंग) उपलब्ध असतील. सलून, पार्लर्समध्ये अत्यावश्यक नसलेल्या सेवा (दाढी, फेशियल, क्लेन्सिंग, ब्लिचिंग आणि त्वचेशी संबंधित इतर सेवा) सुरू करण्याची परवानगी नसेल, अशी नियमावली सरकारकडून घालून दिली जाऊ शकते.
सलून, पार्लर्स ५० टक्के क्षमतेनंच चालवली जावीत, असा नियम राज्य सरकारकडून लागू केला जाऊ शकतो. कर्मचारी आणि ग्राहकांसाठी इन्फ्रा रेड थर्मामीटर्सचा वापर करण्यात यावा आणि एखाद्या व्यक्तीमध्ये लक्षणं आढळून आल्यास त्याला प्रवेश देऊ नये. ग्राहक आणि कर्मचाऱ्यांनी मास्कचा वापर करावा. ग्राहकांनी ग्लोव्ह्ज आणि ऍप्रन वापरावं. सलून, पार्लर्सच्या प्रवेशद्वाराजवळ हँड सॅनिटायझर ठेवावं. प्रत्येक वापरानंतर खुर्ची, क्युबिकल्स सॅनिटाईज कराव्यात. ग्राहकांसाठी विल्हेवाट लावण्याजोगं टॉवेल, नॅपकिन वापरावं. विल्हेवाट लावण्याजोगं टॉवेल, नॅपकिन न वापरल्यास प्रत्येक वापरानंतर ते सॅनिटाईज करावं, अशा सूचना शासनाकडून दिल्या जाऊ शकतात.
VIDEO: तुमच्यात हिंमत असेल तर सरकार पाडाच; शिवसेनेच्या मंत्र्यांचं भाजपाला थेट आव्हान
...अन् जयंत पाटलांनी भागाकार करत फडणवीसांनी दिलेल्या आकडेवारीचा 'सिलिंडर' फोडला
"फडणवीस, एका ट्रेनसाठी ५० लाखांचा खर्च कसा आणि कुठून येतो?; जरा आम्हालाही सांगा"
फडणवीस, तुम्हाला मोदींवर भरवसा नाय का? जयंत पाटलांचा माजी मुख्यमंत्र्यांना चिमटा
विरोधकांकडून सरकारला बदनाम करायचं काम; बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल
"काँग्रेसची सत्ता असलेल्या राज्यांमध्येही राहुल गांधींचं ऐकत नाही"