CoronaVirus चिंताजनक! लक्षणे नाहीत तरीही सांगलीतील व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2020 10:37 PM2020-05-03T22:37:09+5:302020-05-03T22:41:39+5:30
कर्नाळ येथील व्यक्तीला काल दि.२ मे रोजी मिरज सिव्हिल येथील आयसोलेशन कक्षात खबरदारी म्हणून दाखल करण्यात आले.
सांगली : मिरज तालुक्यातील कर्नाळ येथील एक जण सातारा येथे आजोळी आजीचे निधन झाल्याने गेले होते. त्या ठिकाणी त्यांचे मावसभाऊ मुंबईहून आले होते. त्या घरात सातारा येथील एक व्यक्ती कोरोनाबाधित झाल्याचे सातारा येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगली जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांना कळविल्याने खळबळ उडाली होती.
कर्नाळ येथील व्यक्तीला काल दि.२ मे रोजी मिरज सिव्हिल येथील आयसोलेशन कक्षात खबरदारी म्हणून दाखल करण्यात आले. त्या व्यक्तीला कोणतीही लक्षणे नव्हती. तरी या व्यक्तीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. या व्यक्तीची प्रकृती स्थिर आहे.
या व्यक्तीचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग चालू झाले असून त्या ठिकाणी आणि वैद्यकीय पथक पोहोचले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली आहे. सांगली जिल्ह्यात सध्या उपचाराखालील रुग्णांची संख्या ७ झाली आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
CoronaVirus राज्यात दिवसभरात २७ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू; ६७८ रुग्णांचे निदान
CoronaVirus in Mumbai मुंबईत दिवसभरात ४४१ रुग्णांचे निदान, २१ बळी
CoronaVirus वुहान लॅबमधूनच कोरोनाचा प्रसार; पुरेसे पुरावे सापडल्याचा अमेरिकेचा दावा
खूशखबर! मोबाईल, लॅपटॉप ऑनलाईन खरेदी करता येणार; ई-कॉमर्सला मान्यता
कुलभूषण जाधवसाठी अजित डोवालांचे मागच्या दराने प्रयत्न; हरीष साळवेंचा गौप्यस्फोट
आमच्यावर अश्लील शब्दांत टीका केली, आता भाजप नेत्यांकडून रडीचा डाव; जयंत पाटलांचा आरोप