coronavirus: राज्यातील या दोन जिल्ह्यांत ४ ऑगस्टपासून वाजणार शाळेची बेल, शैक्षणिक सत्र सुरू करण्याची तयारी?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2020 09:14 AM2020-07-19T09:14:45+5:302020-07-19T09:23:15+5:30
राज्यात कोरोनाचा फैलाव कमी असलेल्या भागात शाळा सुरू करण्याबाबत सरकारने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
मुंबई - कोरोना विषाणूच्या वाढत्या फैलावामुळे सध्या देश आणि राज्यासमोर सध्या गंभीर आव्हान उभे राहिलेले आहे. कोरोनामुळे अनेक उद्योग व्यवसायांसोबतच शिक्षणक्षेत्रालाही फटका बसला असून, मार्च महिन्यापासूनच शाळा बंद आहेत. दरम्यान, राज्यात कोरोनाचा फैलाव कमी असलेल्या भागात शाळा सुरू करण्याबाबत सरकारने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून चंद्रपूर आणि गडचिरोली भागात शाळा सुरू करण्याबाबत तयारी सुरू झाली आहे. या जिल्ह्यांमध्ये ४ ऑगस्टपासून शाळा सुरू करण्यात येण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांत देशातील आणि राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या चिंताजनक पद्धतीने वाढत आहे. देशातील कोरोनाबाधितांचा आकडा दहा लाखांच्या तर राज्यातील बाधितांची संख्या तीन लाखांच्या वर गेली आहे. मात्र असले तरी राज्यात कोरोनाचा संसर्ग हा मुख्यत्वेकरून मोठी शहरे आणि आसपासच्या भागात आहे. तर ग्रामीण भागात मात्र कोरोनाचा फैलाव तितकासा झालेला नाही. मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद, नाशिक या पट्ट्यात कोरोनाने धुमाकूळ घातला असला तरी विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर आदी भागात कोरोनाचा फैलाव मर्यादित राहिला आहे.
त्यामुळे गडचिरोली आणि चंद्रपूरमध्ये ४ ऑगस्टपासून शाळा सुरू करण्याची तयारी शिक्षण खात्याकडून करण्यात आली आहे. यासंदर्भातील वृत्त काही प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केले आहे. तसेच त्यासाठी या दोन्ही जिल्ह्यामधील शाळा सॅनिटाइझ करून घेण्याची सूचना पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रशासनाला केली आहे. त्यामुळे आता याबाबत पुढच्या काळात कोणता अंतिम निर्णय होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
coronavirus: धक्कादायक! कोरोनाच्या रिपोर्टमध्ये केले गोलमाल, डॉक्टर झाला मालामाल
भारतानंतर आता या देशाने चीनला दाखवली सैनिकी तादक, घुसखोरीला चोख प्रत्युत्तर देण्याचा दिला इशारा
महिंद्रांनी सुरक्षा दलांसाठी आणले दणकट चिलखती अस्र; आता माओवादी, दहशतवाद्यांची खैर नाही
…म्हणून भारतातील दहा पैकी तीन कोरोना रुग्ण करू शकत नाहीत प्लाझ्मा दान
coronavirus: कोरोनाबाधित रुग्णाचे तब्बल दीड कोटींचे बिल केले माफ, तिकीट देऊन केली मायदेशी पाठवणी