CoronaVirus : धक्कादायक! राज्यात कोरोनाचे ८११ नवे रुग्ण, आतापर्यंतचे सर्वाधिक निदान

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2020 09:02 PM2020-04-25T21:02:04+5:302020-04-25T21:18:34+5:30

CoronaVirus : राज्यात शनिवारी ८११ कोरोना रुग्णांचे निदान झाले असून रुग्णसंख्या ७ हजार ६२८ वर पोहोचली आहे.

CoronaVirus: Shocking! 811 new corona patients, the highest number of diagnoses in the maharashtra rkp | CoronaVirus : धक्कादायक! राज्यात कोरोनाचे ८११ नवे रुग्ण, आतापर्यंतचे सर्वाधिक निदान

CoronaVirus : धक्कादायक! राज्यात कोरोनाचे ८११ नवे रुग्ण, आतापर्यंतचे सर्वाधिक निदान

googlenewsNext

मुंबई : राज्यात कोरोनावरील उपचारपद्धतींवर विविध प्रयोग होत आहे, आरोग्य यंत्रणा अहोरात्र झटते आहे. मात्र असे असूनही राज्यातील कोरोना रुग्णांचा आलेख दिवसागणिक वाढत आहे. 

राज्यात शनिवारी ८११ कोरोना रुग्णांचे निदान झाले असून रुग्णसंख्या ७ हजार ६२८ वर पोहोचली आहे. तर दिवसभरात २२ मृत्यूंची नोंद झाली असून ३२३ वर पोहोचली आहे. मुंबईतही २८१ कोरोना रुग्णांची नोंद झाली असून रुग्णसंख्या ५ हजार ४९ झाली आहे. तर दिवसभरात मुंबईत १३ मृत्यू झाले असून मृत्यूंचा आकडा १९१ इतका झाला आहे.

राज्यात आज झालेल्या २२ मृत्यूंपैकी १६ पुरुष तर ६ महिला आहेत. यात मुंबईतील १३, पुणे महानगरपालिकेतील चार, तर मालेगाव, पुणे ग्रामीण, पिंपरी चिंचवड, धुळे आणि सोलापूर शहरात प्रत्येकी एका मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात शनिवारी ११९ कोरोना रुग्ण बरे झाले आहेत, तर आजपर्यंत १०७६ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

सध्या राज्यात १ लाख २५ हजार ३९३ लोक घरगुती अलगीकरणात आहेत. तर ८ हजार १२४ लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १ लाख ८ हजार ९७२ नमुन्यांपैकी १ लाख १ हजार १६२ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील: (कंसात मृत्यूंची आकडेवारी)
मुंबई महानगरपालिका: ५०४९ (१९१)
ठाणे: ७१७ (१५) 
पालघर: १३९ (४)
 रायगड: ५६ (१)
मुंबई मंडळ एकूण: ५९६१ (२११)

नाशिक: १३१ (१२)
अहमदनगर: ३५ (२)
धुळे: २५ (३)
जळगाव: १३ (२)
नंदूरबार: ११ (१)
नाशिक मंडळ एकूण: २१५ (२०)

पुणे: १०३० (७३)
सोलापूर: ४६ (४)
सातारा: २९ (२)
पुणे मंडळ एकूण: ११०५ (७९)

कोल्हापूर: १०
सांगली: २६ (१)
सिंधुदुर्ग: १
रत्नागिरी: ८ (१)
कोल्हापूर मंडळ एकूण: ४५ (२)

औरंगाबाद: ५० (५)
जालना: २
हिंगोली: ७ 
परभणी: १ 
औरंगाबाद मंडळ एकूण: ६१ (५)

लातूर: ९
उस्मानाबाद: ३ 
बीड: १
नांदेड: १
लातूर मंडळ एकूण: १४

अकोला: २३ (१)
अमरावती: १९ (१)
यवतमाळ: २८
बुलढाणा: २१ (१)
वाशिम: १ 
अकोला मंडळ एकूण: ९२ (३)

नागपूर: १०७ (१)
वर्धा: ०
भंडारा: ०
गोंदिया: १
चंद्रपूर: २
गडचिरोली: ०
नागपूर मंडळ एकूण: ११० (१)

इतर राज्ये: २५ (२)
एकूण: ७६२८  (३२३)

( टीप – या तक्त्यातील रुग्ण संख्या  रुग्णाने दिलेल्या पत्यानुसार आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आय सी एम आर संकेतस्थळावरील माहिती जिल्हावार उपलब्ध असल्याने ती जिल्हावार सादर करण्यात आलेली आहे.)

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या ५५५ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण ८१९४ सर्वेक्षण पथकांनी  काम केले असून त्यांनी ३१.४३ लाख  लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.

Web Title: CoronaVirus: Shocking! 811 new corona patients, the highest number of diagnoses in the maharashtra rkp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.