coronavirus: राज्याला आज कोरोनापासून किंचित दिलासा! रुग्णांची संख्या घटली, २५८ मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2020 09:29 PM2020-08-23T21:29:18+5:302020-08-23T21:31:54+5:30

आज कोरोनाच्या १० हजार ४४१ नव्या रुग्णांची नोंद झाल्याने राज्यातील कोरोनाच्या एकूण रुग्णांचा आकडा हा ६ लाख ८२ हजार ३८३ वर पोहोचला आहे. तर आज झालेल्या २५८ मृत्यूंमुळे राज्यातील मृतांची संख्या २२ हजार २५३ वर पोहोचली आहे.

coronavirus: Slight relief to the state from Corona today! Today the number of new patients decreased, 258 deaths | coronavirus: राज्याला आज कोरोनापासून किंचित दिलासा! रुग्णांची संख्या घटली, २५८ मृत्यू

coronavirus: राज्याला आज कोरोनापासून किंचित दिलासा! रुग्णांची संख्या घटली, २५८ मृत्यू

Next
ठळक मुद्देआज राज्यामध्ये कोरोनाच्या १० हजार ४४१ रुग्णांची नोंद दिवसभरात राज्यात २५८ रुग्णांचा मृत्यू राज्यात आज दिवसभरात ८ हजार रुग्णांनी १५७ रुग्णांनी कोरोनावर केली मात

मुंबई - शनिवारच्या तुलनेत राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये आज लक्षणीय घट झाली असून, आज राज्यामध्ये कोरोनाच्या १० हजार ४४१ रुग्णांची नोंद झाली आहे. तर आज दिवसभरात राज्यात २५८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे राज्यात आज दिवसभरात ८ हजार रुग्णांनी १५७ रुग्णांनी कोरोनावर मात केली. तसेच राज्यातील कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण हे ७१.५५ टक्क्यांवर पोहोचले आहे.

आज कोरोनाच्या १० हजार ४४१ नव्या रुग्णांची नोंद झाल्याने राज्यातील कोरोनाच्या एकूण रुग्णांचा आकडा हा ६ लाख ८२ हजार ३८३ वर पोहोचला आहे. तर आज झालेल्या २५८ मृत्यूंमुळे राज्यातील मृतांची संख्या २२ हजार २५३ वर पोहोचली आहे.


कोरोनाचे रुग्ण वाढत असतानाच बऱ्या होणाऱ्यांचीही संख्या वाढत आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१.५५ टक्क्यांवर पोहोचले आहे. आज ८ हजार १५७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यभरात आतापर्यंत एकूण ४ लाख ८८ हजार २७१ रुग्ण बरे झाले आहेत. आज १० हजार ४४१ नविन रुग्णांचे निदान झाले असून, सध्या १ लाख ७१ हजार ५४२ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३६ लाख १६ हजार ७०४ नमुन्यांपैकी ६ लाख ८२ हजार ३८३ नमुने पॉझिटिव्ह (१८.८६ टक्के) आले आहेत. राज्यात १२ लाख ३० हजार ९८२ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३४ हजार ८२० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २५८ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.२६ टक्के एवढा आहे.

आज निदान झालेले १०,४४१ नविन रुग्ण आणि नोंद झालेले २५८ मृत्यू यांचा तपशील असा(कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-९९१ (३४), ठाणे- १५० (१), ठाणे मनपा-१४३ (४), नवी मुंबई मनपा-३४८ (८), कल्याण डोंबिवली मनपा-२१५, उल्हासनगर मनपा-१३ (७), भिवंडी निजामपूर मनपा-१५ मीरा भाईंदर मनपा-११२ (३), पालघर-२११ (२), वसई-विरार मनपा-१३७ (१), रायगड-१९७ (२), पनवेल मनपा-१३८, नाशिक-२२६ (३), नाशिक मनपा-१२२ (७), मालेगाव मनपा-३८ (२), अहमदनगर-२६६ (९),अहमदनगर मनपा-२३१ (३), धुळे-२०, धुळे मनपा-३४ (४), जळगाव-४८७ (२), जळगाव मनपा-१४० (२), नंदूरबार-११९, पुणे- ५६९ (११), पुणे मनपा-१२८८ (४०), पिंपरी चिंचवड मनपा-६७९ (१६), सोलापूर-२७६ (५), सोलापूर मनपा-४० (१), सातारा-२५३ (७), कोल्हापूर-३४३ (१२), कोल्हापूर मनपा-१७९ (१), सांगली-१५० (६), सांगली मिरज कुपवाड मनपा-१७५ (५), सिंधुदूर्ग-० (१), रत्नागिरी-३६ (२), औरंगाबाद-३६ (३),औरंगाबाद मनपा-३४ (४), जालना-९० (३), हिंगोली-६४, परभणी-३२, परभणी मनपा-५४ (१), लातूर-१०५ (५), लातूर मनपा-४१ (१), उस्मानाबाद-१८३ (४),बीड-८१ (५), नांदेड-४९ (१), नांदेड मनपा-१६ (३), अकोला-१८, अकोला मनपा-६, अमरावती-३३, अमरावती मनपा-३६ (१), यवतमाळ-५९ (२), बुलढाणा-६१, वाशिम-३३, नागपूर-१३८, नागपूर मनपा-६८० (२२), वर्धा-१६, भंडारा-१४ (१), गोंदिया-२२, चंद्रपूर-४४ (१), चंद्रपूर मनपा-३५, गडचिरोली-१४, इतर राज्य १६.

Web Title: coronavirus: Slight relief to the state from Corona today! Today the number of new patients decreased, 258 deaths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.