coronavirus:...म्हणून व्हॉल्व असलेला मास्क वापरू नका

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2020 05:10 AM2020-07-11T05:10:44+5:302020-07-11T07:12:59+5:30

सध्या अनेक जण बाहेरच्या बाजूने व्हॉल्व असलेले मास्क वापरत आहेत. अनेकांना हाच सर्वोत्तम मास्क आहे, असा गैरसमज झाला आहे.

coronavirus: So do not use a mask with a valve | coronavirus:...म्हणून व्हॉल्व असलेला मास्क वापरू नका

coronavirus:...म्हणून व्हॉल्व असलेला मास्क वापरू नका

Next

- डॉ. अमोल अन्नदाते 
(लेखक बालरोगतज्ज्ञ असून,
वैद्यकीय साक्षरतेचे काम करतात.)

सध्या अनेक जण बाहेरच्या बाजूने व्हॉल्व असलेले मास्क वापरत आहेत. अनेकांना हाच सर्वोत्तम मास्क आहे, असा गैरसमज झाला आहे. या मास्कचे निरीक्षण केल्यावर लक्षात येईल की, श्वास आत घेताना हा व्हॉल्व बंद होतो  व बाहेर सोडताना व्हॉल्व आपोआप उघडतो. या मास्कच्या व्हॉल्वमधून कोरोना तसेच इतर विषाणू सहज बाहेर जाऊ शकतात. या मास्कमुळे मास्क घालणाऱ्या व्यक्तीला कदाचित संसर्ग होईल. पण समोरच्या बाधित व्यक्तीलाही व्हॉल्व असलेल्या मास्कचा धोका माहीत नसेल व तो हा मास्क वापरत असेल तर,  अशा संसर्गित व्यक्तीपासून इतरांचे संरक्षण होणार नाही. मास्क वापरण्याचा हेतू फक्त स्वत:चेच रक्षण नव्हे तर इतरांनाही आपल्यापासून संसर्ग होऊ नये, हा आहे. त्यामुळे हे मास्क कोणीही वापरू नये. शासनानेही या मास्कवर बंदी घालावी.

मुळात व्हॉल्व असलेले मास्क हे जिथे जागा पूर्ण बंद आहे व हवेचा दाब कमी आहे अशा जागेत काम करणाऱ्यांसाठी बनवले गेले होते. खाणी व खोदकामात, बोगद्यात काम करणाºया कर्मचाºयांचा श्वास गुदमरू नये यासाठी मास्कमध्ये व्हॉल्वची योजना आहे. मोकळ््या जागेत व्हॉल्व नसलेले मास्क वापरले तरी श्वास घेण्यास त्रास होण्याची, जीव गुदमरण्याची भीती नाही. व्हॉल्वमधून कोरना संसर्ग इतरांना होण्याची शक्यता आहे. व्हॉल्व नसलेले मास्कच वापरावे.

Web Title: coronavirus: So do not use a mask with a valve

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.