coronavirus : संचारबंदीदरम्यान पोलिसांच्या मदतीसाठी एसटी कर्मचारी तयार, परिवहनमंत्र्यांना लिहिले पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2020 10:00 AM2020-03-26T10:00:57+5:302020-03-26T10:03:56+5:30

संचारबंदीदरम्यान बंदोबस्तासाठी आवश्यकता भासल्यास एसटी महामंडळाचे कर्मचारी सज्ज असल्याचे सांगत एका एसटी कर्मचाऱ्याने राज्याच्या परिवहनमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. 

coronavirus: ST staff ready to assist police during curfew, letter to Transport Minister BKP | coronavirus : संचारबंदीदरम्यान पोलिसांच्या मदतीसाठी एसटी कर्मचारी तयार, परिवहनमंत्र्यांना लिहिले पत्र

coronavirus : संचारबंदीदरम्यान पोलिसांच्या मदतीसाठी एसटी कर्मचारी तयार, परिवहनमंत्र्यांना लिहिले पत्र

Next

मुंबई - महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असल्याने लोकांनी. घराबाहेर पडू नये, असे आवाहन शासनाकडून करण्यात येत आहे. मात्र तरीही अनेक लोक घराबाहेर पडत असल्याने बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांवर ताण येत आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या मदतीसाठी पुढे येण्याची तयारी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी दर्शवली आहे. संचारबंदीदरम्यान बंदोबस्तासाठी आवश्यकता भासल्यास एसटी महामंडळाचे कर्मचारी सज्ज असल्याचे सांगत एका एसटी कर्मचाऱ्याने राज्याच्या परिवहनमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. 

संचारबंदी तसेच जिल्हाबंदीमुळे अपवाद वगळता एसटीसेवा बंद आहे. त्या पार्श्वभूमीवर लिहिलेल्या या पत्रात हा कर्मचारी लिहितो की, "कोरोना हा संसर्गजन्य रोग थांबविण्यासाठी मा. पंतप्रधानांनी एकवीस दिवसांचा लाॅक डाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात  संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संचारबंदी काळात सर्वात जास्त ताण हा महाराष्ट्रातील पोलिसांवर येणार आहे. रात्रंदिवस सतत कामावर राहावे लागणार आहे.  पोलिसांनी आपले कुटुंब सोडून कितीही तास बाहेर राहावे लागत आहे. 
सर्वसामान्य जनतेला सांभाळता सांभाळता स्वतःकडे आणि आपल्या कुटुंबाकडे लक्ष देण्याकरिता पोलिसांकडे मुळीच वेळ नाही. तसेच कामाचा प्रचंड प्रमाणात ताणतणाव सुद्धा सहन करावा लागत आहे. 
महाराष्ट्रातील जनतेला आटोक्यात आणण्यासाठी पोलीस बांधव प्रामाणिकपणे प्रयत्न करीत आहेत. महाराष्ट्रातील अत्यावश्यक सेवा असलेल्या पोलीस यंत्रणा आणि  दवाखाने जनतेच्या सेवेसाठी अहोरात्र कार्यरत आहेत. 

महाराष्ट्रातील अत्यावश्यक सेवांपैकी एक एसटी महामंडळ सुद्धा आहे. सर्व जिल्ह्य़ातील सीमा बंद केल्याने आणि मा. मुख्यमंत्री साहेबांच्या आदेशानुसार ठराविक ठिकाण सोडता संपूर्ण एसटी महामंडळ बंदच आहे. 
प्रवाशांच्या सेवेसाठी अर्थातच जनतेच्याच सेवेसाठी सदैव कार्य  तत्पर असलेले कर्मचारी म्हणजेच एसटीचे कर्मचारी. महाराष्ट्रावर आलेल्या संकटात एसटी कर्मचारी नेहमीच कोणत्या ना कोणत्या प्रकारे मदत करतच असतात. 

आज महाराष्ट्रवर तसेच देशावर माहामारीचे संकट उभे टाकले आहे. फक्त घरात बसून राहणे हाच एक रामबाण उपाय आहे. जनतेने घराबाहेर पडू नये म्हणून संचारबंदी लागू केलेली आहे. संचारबंदीच्या अंमलबजावणीसाठी मनुष्यबळाची आवश्यकता पडल्यास एसटी महामंडळाच्या चालक, वाहक, यांत्रिक, प्रशासकीय कर्मचाऱ्यांना महाराष्ट्राची तसेच देशाची सेवा करण्यासाठी आम्हाला संधी देण्यात यावी, अशी कळकळीची विनंती सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने मा. परिवहन मंत्री साहेबांना करतो, असे या पत्रात म्हटले आहे.

"सर्वसामान्य जनतेला बाहेर येऊ न देणे. गरज पडल्यास आवश्यक वस्तू साठी बाहेर आलेच तर जमाव होऊ न देणे. हे काम आम्ही काटेकोरपणे करू. यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने जमावबंदी पथक अशा आशयाचे एक ओळखपत्र तयार करून देण्यात यावे.ग्रामीण भागात एसटी कर्मचारी  जास्त प्रमाणात वास्तव्यास आहेत. आणि तिथे पोलीस प्रशासन शहरीभागा सारखे  जास्त प्रमाणात ताकद लावू शकत नाहीत. त्यामुळे अशा ठिकाणी एसटी कर्मचार्‍यांचा उपयोग चांगल्याप्रकारे होऊ शकतो. 
पुन्हा एकदा  राज्याची,देशाची सेवा करायची संधी आम्हाला द्यावी, अशी विनंती राज्य परिवहन मंडळाच्या या कर्मचाऱ्यांने परिवहन मंत्र्यांकडे केली आहे.

Web Title: coronavirus: ST staff ready to assist police during curfew, letter to Transport Minister BKP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.