CoronaVirus: १२ लाख बांधकाम मजुरांना सरकारकडून आर्थिक मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2020 04:50 AM2020-04-19T04:50:06+5:302020-04-19T06:53:06+5:30

सरकारचा दिलासा; ‘लोकमत’च्या पाठपुराव्याला यश; रक्कम थेट खात्यात जमा होणार

CoronaVirus state government announces financial aid to 12 lakh construction workers | CoronaVirus: १२ लाख बांधकाम मजुरांना सरकारकडून आर्थिक मदत

CoronaVirus: १२ लाख बांधकाम मजुरांना सरकारकडून आर्थिक मदत

Next

मुंबई : कोरोनामुळे असलेल्या लॉकडाऊनमध्ये रोजगार हिरावलेल्या बारा लाख बांधकाम मजुरांना प्रत्येकी दोन हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय राज्य शासनाने शनिवारी घेतला. ही रक्कम मजुरांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. त्यासाठी २४0 कोटी रुपयांचा खर्च येईल ही मदत मिळण्यासंदर्भात लोकमतने सातत्याने पाठपुरावा केला होता.

बांधकाम कामगारांना भेडसावत असलेल्या अडचणीमध्ये त्यांना आर्थिक साहाय्य देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील व संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार मंडळाकडील नोंदीत बांधकाम मजुरांना अर्थसाहाय्य देण्याचा निर्णय झाला. त्यामुळे या मजुरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोºहे यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. सिटू संघटनेने याबाबत नाराजी व्यक्त करीत किमान पाच हजारांची मदत द्यायला हवी होती असे सिटूचे राज्य अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांनी म्हटले आहे.

२० दिवसांपूर्वीच पाठवला होता प्रस्ताव
बांधकाम परवानगी देताना विकासकाकडून उपकर वसूल करून मंडळाकडे जमा करण्यात येतो. त्यापोटी ९.५ हजार कोटींचा निधी शासनाकडे आहे. त्यातून ही मदत देण्याची मागणी होती. २0 दिवसांपूर्वी कामगार विभागाने एक प्रस्ताव मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठवला होता. त्यात दोन टप्प्यांत प्रत्येकी अडीच हजारांची मदत द्यावी, असे म्हटले होते. मात्र आता एकाच वेळी २ हजार रुपये दिले जातील. कामगार मंत्री वळसे-पाटील यांनी सांगितले की, ही रक्कम तत्काळ मजुरांच्या बँक खात्यात जमा केली जाईल.

Web Title: CoronaVirus state government announces financial aid to 12 lakh construction workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.