Coronavirus News: ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; कोरोना उपचारांसाठी रेमडेसिवीरची १० हजार इंजेक्शन्स खरेदी करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2020 03:20 PM2020-06-06T15:20:25+5:302020-06-06T15:47:00+5:30

coronavirus News: अमेरिकेच्या एफडीएकडून रेमडेसिवीरच्या आपत्कालीन स्थितीतील वापराला परवानगी

coronavirus state government to procure 10 thousand vials of Remdesivir | Coronavirus News: ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; कोरोना उपचारांसाठी रेमडेसिवीरची १० हजार इंजेक्शन्स खरेदी करणार

Coronavirus News: ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; कोरोना उपचारांसाठी रेमडेसिवीरची १० हजार इंजेक्शन्स खरेदी करणार

Next

मुंबई: ठाकरे सरकार रेमडेसिवीर औषधाची १० हजार इंजेक्शन खरेदी करणार आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी याबद्दलची माहिती दिली आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करताना रेमडेसिवीरचे सकारात्मक परिणाम दिसत असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं सुचवलं असल्याचं टोपेंनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. त्यामुळेच राज्य सरकार या औषधाची इंजेक्शन्स खरेदी करणार असल्याची माहिती टोपेंनी ट्विटमधून दिली आहे. 



'महाराष्ट्र शासन रेमडेसिवीरची १० हजार इंजेक्शन खरेदी करणार आहे. प्रयोगशाळा, प्राणी आणि क्लिनिकल अभ्यासाच्या पुराव्यांच्या आधारे MERS- CoV आणि SARS मध्ये यास आशादायक परिणाम मिळाला आहे, जो देखील कोरोना व्हायरसमुळे होतो. कोविड-१९ च्या उपचारात रेमडेसिवीरचे काही सकारात्मक परिणाम होऊ शकतात, असं जागतिक आरोग्य संघटना सुचवते. हे औषध अत्यंत महाग असून गरीब लोकांना देण्याच्या दृष्टीने व्यवस्था केली,' असं राजेश टोपेंनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.



रेमडेसिवीर औषधाची विक्री करण्याची परवानगी अमेरिकन कंपनी जिलाद सायन्सेसनं आठवड्यापूर्वीच भारत सरकारकडे मागितली आहे. तत्पूर्वी अमेरिकेतल्या संशोधकांनी महिनाभर रेमडेसिवीर आणि या औषधाचा कोरोना रुग्णांवरील उपचारातील उपयोग यावर संशोधन केलं. कोरोनावरील उपचारांमध्ये रेमडेसिवीरचा वापर करू देण्याची मागणी डॉक्टर अनेक दिवसांपासून करत आहेत. रेमडेसिवीर औषध कोरोना रुग्णांवरील उपचारांत प्रभावी ठरत असल्याचं अमेरिकेत आढळून आलं आहे. मात्र यावर भारतात अद्याप तरी कोणतंही संशोधन झालेलं नाही.

प्रकृती अतिशय गंभीर असलेल्या कोरोना रुग्णांवरील उपचारांदरम्यान रेमडेसिवीरचा वापर परिणामकारक ठरत असल्याचं अमेरिकेत झालेल्या संशोधनातून समोर आलं आहे. अमेरिकेतील अन्न आणि औषध प्रशासनानं (यूएसएफडीए) आपत्कालीन परिस्थितीत रेमडेसिवीरचा वापर करण्याची परवानगी दिली आहे. 

...तर भारतातील कोरोना रुग्णांची संख्या १९ लाखांपेक्षा जास्त असेल; ट्रम्प यांचा दावा

देशात एका दिवसात कोरोनाचे तब्बल 9887 नवे रुग्ण, 294 जणांचा मृत्यू; चिंताजनक आकडेवारी

कोरोनाच्या लढ्यात WHO ने जारी केल्या मास्क संदर्भात नव्या गाईडलाईन्स

Read in English

Web Title: coronavirus state government to procure 10 thousand vials of Remdesivir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.