coronavirus: ठाणे, केडीएमसीत पुन्हा कडक लॉकडाऊन! मीरा-भाईंदर, पुण्यातही घातले निर्बंध

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2020 06:15 AM2020-07-11T06:15:47+5:302020-07-11T06:16:45+5:30

ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि मीरा-भाईंदर महानगरपालिकांच्या क्षेत्रात पुन्हा १२ ते १९ जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे.

coronavirus: Strict lockdown in Thane, KDM again! Meera-Bharinder, Pune also imposed restrictions | coronavirus: ठाणे, केडीएमसीत पुन्हा कडक लॉकडाऊन! मीरा-भाईंदर, पुण्यातही घातले निर्बंध

coronavirus: ठाणे, केडीएमसीत पुन्हा कडक लॉकडाऊन! मीरा-भाईंदर, पुण्यातही घातले निर्बंध

Next

ठाणे/पुणे : गेल्या काही दिवसांत वाढलेली कोरोना रुग्णांची साखळी तोडण्यासाठी १२ जुलैपासून ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि मीरा-भा^र्इंदरमध्ये महानगरपालिकांच्या क्षेत्रात तर सोमवार (दि.१३) मध्यरात्रीपासून पुणे शहरासह पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा कडक लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय शुक्रवारी घेण्यात आला. औरंगाबाद शहरात १० जुलैपासूनच लॉकडाऊन वाढवण्यात आला असून त्याची कडक अंमलबजावणी सुरू आहे.

ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि मीरा-भाईंदर महानगरपालिकांच्या क्षेत्रात पुन्हा १२ ते १९ जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा तसेच किराणा, भाजीपाला आणि वैद्यकीय सेवा यातून वगळण्यात आल्या आहेत. ठाणे शहरात सध्या ३९२ कंटेनमेंट झोन असून रुग्णांची संख्या गुणाकार पद्धतीने वाढली आहे.

पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर, हवेली तालुक्यासह जिल्ह्यातील पाचपेक्षा अधिक रुग्ण असलेल्या गावांमध्ये पुढील दहा दिवस म्हणजे २३ जुलैपर्यंत अत्यंत कडक लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. यामध्ये पहिल्या पाच दिवसांत म्हणजे १८ जुलै पर्यंत नागरिकांना केवळ दूध मिळणार असून, भाजीपाल्यासह किराणा मालाची दुकाने बंद राहणार आहेत. उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यासोबत झालेल्या आढावा बैठकीनंतर जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्यासह जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पत्रकार परिषदेत दिली.

राज्यात ७,८६२ रुग्ण वाढले
मुंबई : राज्यात दिवसभरात तब्बल ७८६२ नवीन कोरोना रूग्णांची नोंद झाली तर २२६ जणांचा मृत्यू झाला. बाधितांची संख्या आठ हजारांच्या जवळ गेली असली तरी बरे होणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. शुक्रवारी ५३६६ रूग्ण बरे झाले असून आतापर्यंत १,३२,६२५ रुग्ण बरे झाले.

देशात २६,५०६ नवे रुग्ण
देशात गेल्या २४ तासात कोरोना रुग्णांची संख्या २६ हजार ५०६ ने वाढल्याने एकूण रुग्णसंख्या ७ लाख ९३ हजार ८०२ इतकी झाली आहे. एका दिवसात ४७५ मृत्यू झाल्याने एकूण बळींचा आकडा २१ हजार ६०४ वर पोहचला आहे. या आजारातून ४ लाख ९५ हजार ५१२ रुग्ण बरे होऊन घरी घेले आहेत. देशातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६२.४२ टक्के इतके आहे.

Web Title: coronavirus: Strict lockdown in Thane, KDM again! Meera-Bharinder, Pune also imposed restrictions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.