CoronaVirus News: ‘अपयश झाकण्यासाठी राज्याचे केंद्राकडे बोट’

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 11:59 PM2020-06-16T23:59:34+5:302020-06-17T00:00:40+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने दुसऱ्या कार्यकाळाच्या पहिल्या वर्षात अत्यंत चांगली कामगिरी करताना कोरोनाचा प्रभावी मुकाबला, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेची यशस्वी अंमलबजावणी, आत्मनिर्भर भारतासाठी कल्पक उपाययोजना, आदीसह अनेक समस्या सोडविणारे एतिहासिक निर्णय घेतले.

CoronaVirus thackeray government trying to hide their failure says bjp | CoronaVirus News: ‘अपयश झाकण्यासाठी राज्याचे केंद्राकडे बोट’

CoronaVirus News: ‘अपयश झाकण्यासाठी राज्याचे केंद्राकडे बोट’

Next

पालघर : जीएसटीची सर्व रक्कम केंद्राकडे जमा होते. त्यातून राज्य सरकारला येणारी रक्कम दिली जात नसल्याचा केंद्र सरकारवरील आरोप खोडून काढीत आपले अपयश झाकण्यासाठी राज्य सरकार केंद्राकडे नेहमीच बोट दाखवीत असल्याचा आरोप आमदार, भाजपचे प्रदेश सरचिटणीस अतुल भातखळकर यांनी पत्रकार परिषदेत केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने दुसऱ्या कार्यकाळाच्या पहिल्या वर्षात अत्यंत चांगली कामगिरी करताना कोरोनाचा प्रभावी मुकाबला, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेची यशस्वी अंमलबजावणी, आत्मनिर्भर भारतासाठी कल्पक उपाययोजना, आदीसह अनेक समस्या सोडविणारे एतिहासिक निर्णय घेतले. वर्षभरातील यशस्वी वर्षपूर्तीच्या माध्यमातून भाजपचे प्रदेश सरचिटणीस आ. भातखळकर यांनी पालघरच्या विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील, माजी आमदार पास्कल धनारे, उपजिल्हाध्यक्ष प्रशांत पाटील, युवाध्यक्ष समीर पाटील आदी उपस्थित होते.

मंत्री घरात, जनता रस्त्यावर
राज्य सरकारने उपाययोजनांच्या दृष्टीने पावले उचलायला हवी होती. मुंबईत मुख्यमंत्री व उपनगरचे पालकमंत्री घरातच आहेत. मंत्री घरात व जनता रस्त्यावर असा आरोप केला.

Web Title: CoronaVirus thackeray government trying to hide their failure says bjp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.