CoronaVirus: कार्यालयांमध्ये थर्मल स्कॅनिंग अनिवार्य - देशमुख

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2020 05:03 AM2020-04-25T05:03:42+5:302020-04-25T05:04:07+5:30

शासकीय, निमशासकीय कार्यालये, शेती आणि शेतीशी संबंधित उद्योग, व्यवसाय व इतर काही आस्थापना सुरू करण्यास परवानगी दिली आहे.

CoronaVirus thermal scanning in offices are Mandatory says amit Deshmukh | CoronaVirus: कार्यालयांमध्ये थर्मल स्कॅनिंग अनिवार्य - देशमुख

CoronaVirus: कार्यालयांमध्ये थर्मल स्कॅनिंग अनिवार्य - देशमुख

googlenewsNext

लातूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन- २ मध्ये शिथिलता देण्यात आलेल्या शासकीय आणि खासगी आस्थापनेच्या ठिकाणी २० पेक्षा अधिक व्यक्ती काम करीत असतील तर अशा ठिकाणी आस्थापनांनी स्वखर्चाने थर्मल स्कॅनिंग व इतर सुरक्षा साधनांचा वापर करणे अनिवार्य आहे, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी म्हटले आहे.

शासकीय, निमशासकीय कार्यालये, शेती आणि शेतीशी संबंधित उद्योग, व्यवसाय व इतर काही आस्थापना सुरू करण्यास परवानगी दिली आहे. २० पेक्षा अधिक कर्मचारी असलेले शासकीय कार्यालय, सुपरमार्केट, पुस्तकांची दुकाने, औषधांची व इतर दुकाने, उद्योग-व्यवसाय या सर्वच ठिकाणी आस्थापनांच्या वतीने स्वखचार्तून थर्मल स्कॅनिंग, मास्क, हॅन्डग्लोज, सॅनिटायझर या व इतर सुरक्षा उपकरणांची व्यवस्था पुरविणे आवश्यक आहे.
सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखण्यासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही नियमावली जारी करण्यात आलेली आहे. सार्वजजनिक ठिकाणी कचरा टाकल्यास ५०० रुपये तर थुंकणाऱ्यांवर १ हजार रुपयाची दंडात्मक कार्यवाही करण्यात येणार आहे, असे ते म्हणाले.

Web Title: CoronaVirus thermal scanning in offices are Mandatory says amit Deshmukh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.