दिलासादायक! डेल्टा प्लसचे ते दोन्ही रुग्ण झाले पूर्णपणे बरे, आता त्या गावातील लोकांचे नमुने तपासणी करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2021 10:39 AM2021-08-12T10:39:19+5:302021-08-12T10:39:57+5:30

Coronavirus in Maharashtra: गोंदिया जिल्ह्यातील २० कोरोना बाधित रुग्णांचे नमुने डेल्टा प्लसच्या अनुषंगाने चाचणीसाठी पुणे येथील सीएसआयआर आयजीआयबी प्रयोगशाळेकडे जून महिन्यात पाठविण्यात आले होते.

Coronavirus: They both became patients of Delta Plus completely healed, now will examine samples from the people of that village | दिलासादायक! डेल्टा प्लसचे ते दोन्ही रुग्ण झाले पूर्णपणे बरे, आता त्या गावातील लोकांचे नमुने तपासणी करणार

दिलासादायक! डेल्टा प्लसचे ते दोन्ही रुग्ण झाले पूर्णपणे बरे, आता त्या गावातील लोकांचे नमुने तपासणी करणार

Next

गोंदिया - कोरोना प्रतिबंध आणि नियंत्रण उपाययोजनांचा एक भाग म्हणून कोरोना विषाणूचे जनुकीय क्रमनिर्धारण (जिनोमिक सिक्वेंसिंग) नियमित स्वरुपात करण्यात येत आहे. याच अंतर्गत गोंदिया जिल्ह्यातील २० कोरोना बाधित रुग्णांचे नमुने डेल्टा प्लसच्या अनुषंगाने चाचणीसाठी पुणे येथील सीएसआयआर आयजीआयबी प्रयोगशाळेकडे जून महिन्यात पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल बुधवारी (दि.११) रात्री आरोग्य विभागाला प्राप्त झाला. त्यात दोन रुग्ण डेल्टा प्लसचे आढळले. मात्र हे दोन्ही रुग्ण आता पूर्णपणे बरे झालेले आहे. (They both became patients of Delta Plus completely healed, now will examine samples from the people of that village)

डेल्टा प्लसच्या अनुषंगाने गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेतून कोरोना बाधित रुग्णांपैकी २० रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेकडे नियमित पाठविले जातात. जून महिन्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने पुणे येथील सीएसआयआर आयजीआयबी प्रयोगशाळेकडे २० कोरोना बाधित रुग्णांचे नमुने पाठविले होते. त्याचा अहवाल बुधवारी रात्री प्राप्त झाला. यात दोन रुग्ण डेल्टा प्लसचे आढळले. यापैकी १ रुग्ण सडक अर्जुनी आणि १ रुग्ण सालेकसा तालुक्यातील आहे. अहवाल प्राप्त होण्यास दोन महिन्याचा कालावधी लागला. अहवाल येईपर्यंत हे दोन्ही रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. त्यामुळे फारशी काळजी करण्याची गरज नाही. मात्र जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाने दोन रुग्णांचा अहवाल डेल्टा प्लसच्या अनुषंगाने पॉझिटिव्ह आल्याने हे रुग्ण आढळलेल्या गावातील सर्वच नागरिकांचे नमुने तपासणी करण्याचा निर्णय घेतला. त्याच अनुषंगाने या दोन्ही गावात आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना पाठविण्यात आले आहे. या दोन्ही गावामध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी लोकमतशी बाेलताना सांगितले.

दोन्ही रुग्णांची हिस्ट्री तपासणार
डेल्टा प्लसच्या अनुषंगाने पॉझिटिव्ह अहवाल आलेले रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून या दोन्ही रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती, त्यांच्या प्रवासाचा संदर्भ याची माहिती घेवून त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचे सुध्दा नमुने घेवून ते प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे.

 एका रुग्णामागे शंभर जणांचे नमुने टेस्ट करणार
काेरोनापेक्षा डेल्टा प्लसचा संसर्ग अधिक वेगाने होत असल्याने या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या शंभर जणांचे नमुने घेवून ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगच दर वाढविण्यावर सुध्दा भर देण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले काेट

कोरोनापेक्षा डेल्टा प्लसचा संसर्गाचा वेग अधिक आहे. सध्या जिल्ह्यात डेल्टा प्लसचा एकही रुग्ण ॲक्टिव्ह नाही. मात्र यानंतरही नागरिकांना पूर्वी इतकी काळजी घेण्याची गरज आहे. कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन गरजेचे आहे.
-डॉ. नितीन कापसे 
(जिल्हा आरोग्य अधिकारी गोंदिया)

Web Title: Coronavirus: They both became patients of Delta Plus completely healed, now will examine samples from the people of that village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.