CoronaVirus : तिसऱ्या लाटेचा धोका मुंबई, पुण्याला सर्वाधिक; राज्यात ६० लाख रुग्णांची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2021 07:52 AM2021-08-26T07:52:23+5:302021-08-26T07:53:27+5:30

CoronaVirus : कोरोना प्रादुर्भावाच्या दुसऱ्या लाटेत ११ मार्च रोजी दिवसाला ९१,१०० कोरोना रुग्णांची भर पडत होती. तिसऱ्या लाटेत हाच आकडा मुंबईसाठी दिवसाला १ लाख ३६ हजार रुग्णांपर्यंत पोहोचू शकतो.

CoronaVirus : Third wave of danger is highest in Mumbai, Pune and 60 lakh patients in the state | CoronaVirus : तिसऱ्या लाटेचा धोका मुंबई, पुण्याला सर्वाधिक; राज्यात ६० लाख रुग्णांची शक्यता

CoronaVirus : तिसऱ्या लाटेचा धोका मुंबई, पुण्याला सर्वाधिक; राज्यात ६० लाख रुग्णांची शक्यता

Next

मुंबई : राज्यात कोरोनाची तिसरी लाट आल्यास कोरोना रुग्णांची संख्या तब्बल ६० लाखांपर्यंत जाऊ शकते. मुंबई आणि पुण्यातून सर्वाधिक रुग्णांची नोंद केली जाऊ शकते, असे अभ्यासात्मक निरीक्षण सार्वजनिक आरोग्य विभागाने व्यक्त केले आहे. 

कोरोना प्रादुर्भावाच्या दुसऱ्या लाटेत ११ मार्च रोजी दिवसाला ९१,१०० कोरोना रुग्णांची भर पडत होती. तिसऱ्या लाटेत हाच आकडा मुंबईसाठी दिवसाला १ लाख ३६ हजार रुग्णांपर्यंत पोहोचू शकतो.  पुण्यात १९ मार्च रोजी दिवसाला १.२५ लाख रुग्णांची नोंद झाली होती. तिसऱ्या लाटेत हीच संख्या तब्बल १.८७ लाख रुग्णांपर्यंत पोहोचू शकते. 

राज्यात पुणे आणि मुंबईत सर्वाधिक रुग्ण आढळण्याची शक्यता आहे. यावर मात करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाला त्यासाठीचा सर्वसमावेशक आराखडा तयार करण्याची गरज आहे. त्यादृष्टीने काम सुरू आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली. 

मुंबईत तिसऱ्या लाटेच्या अंदाजात व्यक्त करण्यात आलेले शिखर हे १.३६ लाख रुग्णांचे आहे. यात ८८ हजार ८२३ रुग्णांना होम क्वारंटाइन, ४७ हजार ९२८ रुग्णांना रुग्णालयात आणि ९५७ रुग्णांना अतिदक्षता विभागातील खाटांची गरज भासू शकते. पुण्याच्या बाबतीत १.२१ लाख रुग्णांवर होम क्वारंटाइन आणि १३१४ रुग्णांना अतिदक्षता खाटांची गरज भासू शकते. ठाण्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत दैनंदिन रुग्णवाढीचे शिखर ८६ हजार ७३२ पोहोचले होते, तर तिसऱ्या लाटेत हाच आकडा १.३ लाखांपर्यंत पोहोचू शकतो आणि ९११ जणांना अतिदक्षता खाटांची गरज भासू शकते. 

मुंबईला २५० मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज 
नागपूरमध्ये रुग्णसंख्या ८० हजारांवरून वाढून १.२१ लाख इतकी होऊ शकते. यात ८५० जणांना अतिदक्षता विभागातील खाटांची गरज पडेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मुंबईला तिसऱ्या लाटेत २५० मेट्रिक टन (एमटी) ऑक्सिजनची गरज भासू शकते. पुण्यात हाच आकडा २७० मेट्रिक टन इतका होऊ शकतो. ठाण्यात १८७ एमटी, नागपुरात १७५ एमटी व नाशिकला ११४ एमटी इतक्या ऑक्सिजनची गरज पडू शकते.

Web Title: CoronaVirus : Third wave of danger is highest in Mumbai, Pune and 60 lakh patients in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.