राजकारण आम्हालाही करता येते, पण...!; रोहित पवारांनी डावखरेंना झापले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2020 09:22 AM2020-03-20T09:22:49+5:302020-03-20T10:45:11+5:30

कोरोनाचं संकट परतवून लावण्यासाठी टोपे मेहनत घेत आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही बैठका आणि पत्रकार परिषदांमध्ये सातत्याने कोरोनावरच चर्चा करत आहेत. मात्र, भाजपाच्या नेत्याने यावरूनही राजकारण सुरु केले आहे.

Coronavirus time not for politics; Rohit Pawar worned bjp's Niranjan Davkhare hrb | राजकारण आम्हालाही करता येते, पण...!; रोहित पवारांनी डावखरेंना झापले

राजकारण आम्हालाही करता येते, पण...!; रोहित पवारांनी डावखरेंना झापले

googlenewsNext

मुंबई : दिवसभर वैद्यकीय क्षेत्रातल्या तज्ज्ञांच्या बैठका, आरोग्य विभागातल्या अधिकाऱ्यांशी चर्चा, पत्रकार परिषदा अशा व्यस्त वेळापत्रकामुळे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची सध्या दमछाक होतेय. त्यातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नवखे असल्याने त्यांच्याजागी महाराष्ट्राला अनुभवी देवेंद्र फडणवीसांची गरज असल्याचे वक्तव्य भाजपाचे नेते आणि आमदार निरंजन डावखरे यांनी केले होते. त्यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सुनावले आहे.

कोरोनाचं संकट परतवून लावण्यासाठी टोपे मेहनत घेत आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही बैठका आणि पत्रकार परिषदांमध्ये सातत्याने कोरोनावरच चर्चा करत आहेत. महाराष्ट्रात कोरोनाचे जवळपास ४९ रुग्ण सापडले असून एका वृद्धाचा मृत्यू झाला आहे. यामुळे कोरोना व्हायरसचे संक्रमण दुसऱ्या टप्प्यात असतानाच रोखण्याचे शिवधनुष्य महाराष्ट्र विकास आघीडी सरकारने उचलले आहे. मात्र, यावर निरंजन डावखरेंनी सध्या महाराष्ट्राला शून्य प्रशासनाचा अनुभव असणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची नाही तर आपत्ती व्यवस्थापनात अनुभवी असणाऱ्या प्रशासकाची म्हणजेच देवेंद्र फडणवीसांची गरज आहे, अशी जहरी टीका केली होती.

महाराष्ट्रावर गेल्या ५ वर्षांत सुका, ओल्या दुष्काळाची संकटे ओढवली होती. गेल्या पावसाळ्यात अर्धा महाराष्ट्र महापुराने वेढलेला होता. यामुळे आपत्ती व्यवस्थापनाचा अनुभव तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीसांकडे जास्त असल्याचा दावा डावखरे यांनी केला आहे. याला शिवसेना नेत्यांनीही प्रत्यूत्तर दिले आहे. मात्र, आज रोहित पवार यांनी एकेकाळचे राष्ट्रवादीतील सहकारी आणि भाजपात गेलेले निरंजन डावखरे यांना चांगलेच झापले आहे.

कोरोना व्हायरसमुळे जगासमोर संकट उभे ठाकले आहे. महाराष्ट्रातील सरकार या व्हायरसला संपविण्यासाठी प्रयत्न करत आहे. साऱ्या महाराष्ट्राला पुढील ३१ मार्च पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. मुंबई, पुण्यातील ऑफिसेसही बंदच ठेवण्यात आली आहेत. या व्हायरसवर औषध नसताना शट डाऊन हेच कमालीचे यशस्वी झालेले अस्त्र आहे. आरोग्यमंत्री टोपे यांची आईही रुग्णालायात वृद्धापकाळामुळे उपचार घेत आहे. तिथेही त्यांना मुलगा म्हणून जाण्यासाठी वेळ मिळत नाही.

यावर रोहित पवार यांनी राजकारण आम्हालाही करता येतं, पण आज ती वेळ नाहीय. संकटाच्या काळात तरी तुमचं राजकारण 'होम क्वारंटाईन' करा. तुमचा एवढा 'अभ्यास' व अनुभव असेल तर मदत करायला तुम्हाला अडवलं कुणी?, असा प्रश्नच निरंजन डावखरेंना विचारत झापले आहे.

Web Title: Coronavirus time not for politics; Rohit Pawar worned bjp's Niranjan Davkhare hrb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.