Coronavirus : ‘प्रतिनियुक्तीवरील वैद्यकीय अधिकाऱ्यांना सेवेत रुजू करा’

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2020 12:18 AM2020-03-24T00:18:17+5:302020-03-24T00:18:53+5:30

coronavirus : सामाजिक कार्यकर्ते अनिल गलगली यांनी ही मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यपाल, सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव अजोय मेहता यांच्याकडे केली आहे.

Coronavirus: 'Treat medical officers on deputation' | Coronavirus : ‘प्रतिनियुक्तीवरील वैद्यकीय अधिकाऱ्यांना सेवेत रुजू करा’

Coronavirus : ‘प्रतिनियुक्तीवरील वैद्यकीय अधिकाऱ्यांना सेवेत रुजू करा’

Next

मुंबई : राज्यात कोरोनामुळे वैद्यकीय आपत्काल सुरू असल्याने मंत्री आणि राज्यमंत्री, तसेच अन्य ठिकाणी वैद्यकीय अधिकारी/ डॉक्टर असलेले अधिकारी प्रतिनियुक्तीवर किंवा अन्य नियुक्तीवर आहेत त्यांना तत्काळ वैद्यकीय सेवेत रुजू करून वैद्यकीय सेवेमध्ये समाविष्ट करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
सामाजिक कार्यकर्ते अनिल गलगली यांनी ही मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यपाल, सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव अजोय मेहता यांच्याकडे केली आहे.
सध्या राज्यात वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती असून मोठ्या प्रमाणात डॉक्टरांची आवश्यकता आहे. अनेक आरोग्य संस्था, प्राथमिक आरोग्य केंद्रे, वैद्यकीय रुग्णालये, उपकेंद्रे, जिल्हा सामान्य रुग्णालये यात वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त असल्याने हा निर्णय तातडीने घेण्यात यावा, असे निवेदनात म्हटले आहे.

Web Title: Coronavirus: 'Treat medical officers on deputation'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.