Coronavirus: परराज्यातून येणाऱ्या ट्रकचालकांना ‘RTPCR’ची गरज नाही; ठाकरे सरकारनं आदेशात केला बदल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2021 07:10 AM2021-05-16T07:10:15+5:302021-05-16T07:14:48+5:30

परराज्यांतील मालवाहतुकीबाबत आदेशात सुधारणा

Coronavirus: Truck drivers from other States do not need ‘RTPCR’; government changes the order | Coronavirus: परराज्यातून येणाऱ्या ट्रकचालकांना ‘RTPCR’ची गरज नाही; ठाकरे सरकारनं आदेशात केला बदल

Coronavirus: परराज्यातून येणाऱ्या ट्रकचालकांना ‘RTPCR’ची गरज नाही; ठाकरे सरकारनं आदेशात केला बदल

Next

मुंबई : कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी १२ मे रोजी लागू केलेल्या ‘ब्रेक दि चेन’ आदेशानुसार, परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या मालवाहतुकीसाठी ट्रकचालकांना आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक केले हाेते. मात्र, शनिवारी या आदेशात सुधारणा केली असून ही चाचणीची गरजेची नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.

आदेशानुसार, मालवाहतूक करणाऱ्यांसाठी साधारणत: दोनपेक्षा जास्त लोक (एक चालक आणि क्लीनर किंवा मदतनीस) किंवा विशेष स्थितीत, लांब पल्ल्याच्या प्रवास किंवा आपत्कालीन स्थितीत मालवाहतूक करणाऱ्यांसाठी तीन व्यक्ती (दोन चालक आणि क्लीनर / मदतनीस) यांना प्रवास करण्याची परवानगी असेल. मालवाहक महाराष्ट्राबाहेरून येणार असतील तर त्यांच्या शरीराचे तापमान व इतर लक्षणे तसेच ‘आरोग्य सेतू’मध्ये त्यांच्या स्थितीची शहानिशा केल्यावरच प्रवेश मिळेल. एकालाही काेराेनाची लक्षणे आढळल्यास सर्वांना जवळच्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात येईल.

दरम्यान, जय भगवान ट्रान्स्पोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र वनवे म्हणाले, या निर्णयामुळे वाहतूकदार, ट्रकचालकांना दिलासा मिळेल. तसेच पुरवठा साखळी सुरळीत राहण्यास मदत होईल.

Web Title: Coronavirus: Truck drivers from other States do not need ‘RTPCR’; government changes the order

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.