Coronavirus Update : चोवीस तासांत राज्यात १०,३५२ रुग्णांची कोरोनावर मात, साडेनऊ हजारांवर नवे रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2021 09:35 PM2021-06-30T21:35:58+5:302021-06-30T21:37:18+5:30
Coronavirus Update In Maharashtra : राज्यात नव्या रुग्णांपेक्षा अधिक कोरोनामुक्त. रुग्ण बरे होण्याचा दर ९६ टक्क्यांवर.
Coronavirus Update In Maharashtra : राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे हाहाकार माजला होता. परंतु आता दुसरी लाट आटोक्यात येताना दिसत आहे. दरम्यान, गेल्या चोवीस तासांत राज्यात कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे.
गेल्या चोवीस तासांत राज्यात १०,३५३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर दुसरीकडे राज्यात ९ हजार ७७१ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर हा ९६.०२ टक्के इतका झाला आहे. सध्या राज्यात १,१६,३६४ सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
#CoronavirusUpdates
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) June 30, 2021
३० जून, संध्या. ६:०० वाजता
२४ तासात बाधित रुग्ण - ६९२
२४ तासात बरे झालेले रुग्ण - ६८०
बरे झालेले एकूण रुग्ण - ६९६१०५
बरे झालेल्या रुग्णांचा दर - ९६%
एकूण सक्रिय रुग्ण- ८३५१
दुप्पटीचा दर- ७१६ दिवस
कोविड वाढीचा दर ( २३ जून ते २९ जून)- ०.०९ % #NaToCorona
मुंबईतही रुग्णसंख्या घटली
मुंबईतही रुग्णसंख्येत कमालीची घट होत असल्याचं दिसून येत आहे. गेल्या चोवीस तासांत मुंबईच ६९२ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर दुसरीकडे ६८० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत सध्या ८,३५१ रुग्णांवर उपचार सुरू असून रुग्ण बरे होण्याचा दर ९६ टक्क्यांवर आला आहे. सध्या रुग्ण दुपटीचा दर हा ७१६ दिवस इतका झाला आहे.