Coronavirus Update : महाराष्ट्रात १०,८९१ नव्या कोरोनाबाधितांची नोंद; १६ हजारांपेक्षा अधिक रुग्ण करोनामुक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2021 08:44 PM2021-06-08T20:44:50+5:302021-06-08T20:47:55+5:30
Coronavirus Maharashtra : गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव होतोय कमी. रुग्ण बरे होण्याचा दरही वाढला.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात हाहाकार माजला होता. त्याचा सर्वाधिक फटका महाराष्ट्रालाही बसला होता. परंतु आता परिस्थिती नियंत्रणात येताना दिसत आहे. गेल्या चोवीस तासांत राज्यात नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. गेल्या चोवीस तासांत राज्यात १६,५७७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
राज्यात गेल्या चोवीस तासांमध्ये १०,८९१ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर १६,५७७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. गेल्या चोवीस तासांत २९५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दरही आता ९५.३५ टक्क्यांवर पोहोचला आहे. राज्यात सध्या १,६७,९२७ रुग्णांवर उपचार सुरू आहे.
Maharashtra reports 10,891 new #COVID19 cases, 16,577 recoveries and 295 deaths in the last 24 hours.
— ANI (@ANI) June 8, 2021
Total cases 58,52,891
Total recoveries 55,80,925
Death toll 1,01,172
Active cases 1,67,927 pic.twitter.com/RkeD9whtnR
#CoronavirusUpdates
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) June 8, 2021
8th June, 6:00pm
Positive Pts. (24 hrs) - 673
Discharged Pts. (24 hrs) - 751
Total Recovered Pts. - 6,80,009
Overall Recovery Rate - 95%
Total Active Pts. - 15,701
Doubling Rate - 543 Days
Growth Rate (1 June - 7 June) - 0.12%#NaToCorona
मुंबईत ६७३ नव्या रुग्णांची नोंद
मुंबईतही आता कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात कमी होताना दिसत आहे. गेल्या चोवीस तासांत मुंबईत ६७३ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर ७५१ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचा दर आता ९५ टक्क्यांवर आला आहे. मुंबईत सध्या १५,७०१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी आता ५४३ दिवसांवर आला आहे.