Coronavirus Update : चोवीस तासांत राज्यात ४,७९७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद; साडेतीन हजारांपेक्षा अधिक कोरोनामुक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2021 09:18 PM2021-08-15T21:18:01+5:302021-08-15T21:19:39+5:30
राज्यात ३,७१० रुग्णांनी केली कोरोनावर मात. राज्यात अनेक ठिकाणी निर्बंध करण्यात आलेत शिथिल.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं देशात हाहाकार माजवला होता. त्याचा सर्वाधिक फटकाही महाराष्ट्राला बसला होता. सध्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत असली तरी राज्यात आता कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात येताना दिसत आहे. गेल्या चोवीस तासांत राज्यात ४,७९७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली.
गेल्या चोवीस तासांत राज्यात ३,७१० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर ४,७९७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. गेल्या चोवीस तासांत राज्यात १३० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. राज्यात सध्या ६४,२१९ अॅक्टिव्ह केसेस आहेत. तर आतापर्यंत राज्यात ६१,८९,९३३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर आता ९६.८३ टक्क्यांवर पोहोचला आहे.
Maharashtra reports 4,797 fresh COVID cases, 3,710 patient discharges, and 130 deaths today
— ANI (@ANI) August 15, 2021
Active cases: 64,219
Total discharges: 61,89,933
Death toll: 1,35,039 pic.twitter.com/SAhgn4ygtI
#CoronavirusUpdates
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) August 15, 2021
१५ ऑगस्त, संध्या. ६:०० वाजता
२४ तासात बाधित रुग्ण - २६७
२४ तासात बरे झालेले रुग्ण - ३०८
बरे झालेले एकूण रुग्ण - ७१८०८३
बरे झालेल्या रुग्णांचा दर - ९७%
एकूण सक्रिय रुग्ण- २८३४
दुप्पटीचा दर- १९२१ दिवस
कोविड वाढीचा दर (८ ऑगस्त ते १४ ऑगस्त)- ०.०४%#NaToCorona
मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात
मुंबईतील कोरोनाची परिस्थिती आता नियंत्रणात असल्याचं दिसून येत आहे. गेल्या चोवीस तासांत मुंबईत २६७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर ३०८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत रुग्ण बरे होण्याचा दर आता ९७ टक्क्यांवर पोहोचला आहे. सध्या मुंबईत २,८३४ रुग्णांवर उपचार सुरू असून रुग्ण दुपटीचा कालावधी १,९२१ दिवस इतका झाला आहे.