Coronavirus Update : दिवसभरात ५,९१६ रुग्ण कोरोनामुक्त; रिकव्हरी रेट ९७ टक्क्यांच्या वर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2021 09:36 PM2021-09-05T21:36:57+5:302021-09-05T21:38:03+5:30
Coronavirus Updates In Maharashtra : दिवसभरात राज्यात ४ हजार ५७ नवीन करोनाबाधित आढळून आले आहेत.
Coronavirus In Maharashtra : राज्यात कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असली तरी धोका अद्याप पूर्णपणे टळलेला नाही. गेल्या चोवीस तासांत ५,९१६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर दुसरीकडे रुग्ण बरे होण्याचा दर आता ९७ टक्क्यांवर गेला आहे. तर गेल्या चोवीस तासांत राज्यात ४ हजार ५७ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली.
गेल्या चोवीस तासांमध्ये राज्यात ४ हजार ५७ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. दुसरीकडे ५,९१६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर चोवीस तासांत ६७ करोनाबाधित रूग्णांच्या मृत्यूंची नोंदही करण्यात आली. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर ९७.०५ टक्के एवढा झाला आहे. आता राज्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या ६४,८६,१७४ झाली आहे. आजर्यंत राज्यात १,३७,७७४ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे.
#CoronavirusUpdates
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) September 5, 2021
५ सप्टेंबर, संध्या. ६:०० वाजता
२४ तासात बाधित रुग्ण -४९६
२४ तासात बरे झालेले रुग्ण -२३७
बरे झालेले एकूण रुग्ण -७२४०७७
बरे झालेल्या रुग्णांचा दर -९७%
एकूण सक्रिय रुग्ण-३८१५
दुप्पटीचा दर -१३६३ दिवस
कोविड वाढीचा दर (२९ ऑगस्त ते ४ सप्टेंबर)-०.०५%#NaToCorona
मुंबईत ४९६ नव्या रुग्णांची नोंद
गेल्या चोवीस तासांमध्ये मुंबईत ४९६ रुग्णांची नोंद झाली आहे. तर २९७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचा दर ९७ टक्क्यांवर पोहोचला आहे. मुंबईत ३,८१५ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. तर दुसरीकडे रुग्ण दुपटीचा कालावधी १३६३ दिवस इतका झाला आहे. आतापर्यंत मुंबईत ७ लाख २४ हजार ०७७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.