Coronavirus Update : राज्यात चोवीस तासांत ८,७५३ नव्या कोरोनाबाधितांची नोंद, ८ हजारांपेक्षा अधिक कोरोनामुक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2021 10:21 PM2021-07-02T22:21:27+5:302021-07-02T22:22:39+5:30
Coronavirus In Maharashtra : गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं रुग्णसंख्येत होत आहे चढउतार. रुग्ण बरे होण्याचा दर ९६ टक्क्यांवर.
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्यानं चढउतार दिसून येत आहे. गेल्या चोवीस तासांत राज्यात साडेआठ हजारांपेक्षा अधिक नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर दुसरीकडे राज्यात आठ हजारांहून अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
राज्यात गेल्या चोवीस तासांत ८,७५३ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर दुसरीकडे ८,३८५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात गेल्या चोवीस तासांमध्ये १५६ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. राज्यात सध्या १, १६,८७६ सक्रिय रुग्ण असून आता रुग्ण बरे होण्याचा दर ९६.०१ टक्क्यांवर पोहोचला आहे.
Maharashtra reports 8,753 new COVID cases, 8,385 discharges, and 156 deaths in the past 24 hours
— ANI (@ANI) July 2, 2021
Active cases: 1,16,876
Total discharges: 58,36,920
Recovery rate: 96.01% pic.twitter.com/Cyr2fLoPkS
#CoronavirusUpdates
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) July 2, 2021
२ जुलै, संध्या. ६:०० वाजता
२४ तासात बाधित रुग्ण - ६७६
२४ तासात बरे झालेले रुग्ण - ५४६
बरे झालेले एकूण रुग्ण - ६९७१४०
बरे झालेल्या रुग्णांचा दर - ९६%
एकूण सक्रिय रुग्ण- ८५९८
दुप्पटीचा दर- ७४४ दिवस
कोविड वाढीचा दर ( २५ जून ते ०१ जुलै)- ०.०९ % #NaToCorona
मुंबईत ६७६ रुग्णांची नोंद
मुंबईत गेल्या चोवीस तासांत ६७६ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर दुसरीकडे ५४६ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत रुग्ण बरे होण्याचा दर ९६ टक्के इतका आहे. मुंबईत सध्या ८,५९८ रूग्णांवर उपचार सुरू असून रुग्ण दुपटीचा कालावधी ७४४ दिवस इतका झाला आहे.