Coronavirus Update : राज्यात ९,८१२ नव्या कोरोनाबाधितांची नोंद, आठ हजारांपेक्षा अधिक कोरोनामुक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2021 09:10 PM2021-06-26T21:10:59+5:302021-06-26T21:12:44+5:30

Coronavirus : रुग्ण बरे होण्याचा दर ९६ टक्क्यांच्या जवळ. चोवीस तासांत १७९ रुग्णांचा मृत्यू.

Coronavirus Update: 9,812 new coronaviruses registered in the state, more than 8,000 coronaviruses released | Coronavirus Update : राज्यात ९,८१२ नव्या कोरोनाबाधितांची नोंद, आठ हजारांपेक्षा अधिक कोरोनामुक्त

Coronavirus Update : राज्यात ९,८१२ नव्या कोरोनाबाधितांची नोंद, आठ हजारांपेक्षा अधिक कोरोनामुक्त

Next
ठळक मुद्देरुग्ण बरे होण्याचा दर ९६ टक्क्यांच्या जवळ.चोवीस तासांत १७९ रुग्णांचा मृत्यू.

राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे हाहाकार माजला होता. परंतु आता रुग्णसंख्या कमी होताना दिसत आहे. असं असलं तरी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आणि कोरोनाच्या डेल्टा विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा एकदा निर्बंध कडक करण्यात आले आहेत. राज्य सरकारनं आता निर्बंधांमध्ये शिथिलता देताना लेव्हल १ आणि २ या वगळल्या आहे. दरम्यान, गेल्या चोवीस तासांत राज्यात ९ हजारांपेक्षा अधिक नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर ८ हजारांपेक्षा अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली.

राज्यात गेल्या चोवीस तासांमध्ये ९,८१२ रूग्णांनी कोरोनावर मात केली. तर दुसरीकडे ८,७५२ रूग्णांनी कोरोनावर मात केली. गेल्या चोवीस तासांमध्ये १७९ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. राज्यात सध्या १,२१,२५१ रुग्णांवर उपचार सुरू असून रुग्ण बरे होण्याचा दर आता ९५.९३ टक्क्यांवर पोहोचला आहे. 



मुंबईत १९१९ रुग्णांची कोरोनावर मात
गेल्या चोवीस तासांत मुंबईत ६४८ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली. तर दुसरीकडे १९१९ रुग्णांनी कोरोनावर मात केली. मुंबईत रुग्ण बरे होण्याचा दर आता ९६टक्के इतका झाला आहे. सध्या मुंबईत ९,१४८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर ७२३ दिवस इतका झाला आहे. 

Web Title: Coronavirus Update: 9,812 new coronaviruses registered in the state, more than 8,000 coronaviruses released

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.