Coronavirus Update : राज्यात चोवीस तासांत ९,९७४ नव्या कोरोनाबाधितांची नोंद, साडेआठ हजारांपेक्षा अधिक कोरोनामुक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2021 09:47 PM2021-06-27T21:47:46+5:302021-06-27T21:49:37+5:30
Coronavirus Update In Maharashtra : रुग्ण बरे होण्याचा दर ९६ टक्क्यांच्या जवळ, १ लाख २० हजारांपेक्षा अधिक अॅक्टिव्ह रुग्ण
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं देशात आणि राज्यात हाहाकार माजवला होता. सध्या नव्या कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असली तरी धोका मात्र अद्यापही टळलेला नाही. गेल्या चोवीस तासांत राज्यात ९ हजारांपेक्षा अधिक नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर दुसरीकडे साडेआठ हजारांपेक्षा अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले.
राज्यात गेल्या चोवीस तासांत राज्यात ९,९७४ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर ८,५६२ रुग्ण कोरोनामुक्त झाले. राज्यात आतापर्यंत एकूण ५७,९०,११३ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात सध्या १,२२.२५२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर आता ९५,९१ टक्के झाला असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
राज्यात आज 9,974 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 8,562 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 57,90,113रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 1,22,252 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 95.91% झाले आहे. pic.twitter.com/E2ed3khoGo
— Rajesh Tope (@rajeshtope11) June 27, 2021
#CoronavirusUpdates
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) June 27, 2021
२७ जून, संध्या. ६:०० वाजता
२४ तासात बाधित रुग्ण - ७४६
२४ तासात बरे झालेले रुग्ण - १२९५
बरे झालेले एकूण रुग्ण - ६९४०८२
बरे झालेल्या रुग्णांचा दर - ९६%
एकूण सक्रिय रुग्ण- ८५८२
दुप्पटीचा दर- ७२८ दिवस
कोविड वाढीचा दर ( २० जून ते २६ जून)- ०.०९ % #NaToCorona
मुंबईत मोठ्या प्रमाणात रुग्ण कोरोनामुक्त
मुंबईतही नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. गेल्या चोवीस तासांत मुंबईत ७४६ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर १,२९५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचा दर आता ९६ टक्क्यांवर पोहोचला आहे. मुंबईत सध्या ८,५८२ रुग्णांवर उपचार सुरू आहे. मुंबईत सध्या रुग्ण दुपटीचा कालावधी हा ७२८ दिवसांवर आला आहे.