Coronavirus Update : राज्यात चोवीस तासांत ३,५९५ नव्या कोरोनाबाधितांची नोंद; ३ हजारांपेक्षा अधिक कोरोनामुक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2021 09:14 PM2021-09-16T21:14:11+5:302021-09-16T21:15:00+5:30
Coronavirus Cases Update In Maharashtra : राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर ९७ टक्क्यांवर.
राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या कमी होताना दिसत असली तरी धोका अद्यापही पूर्णपणे टळलेला नाही. दरम्यान, तर दुसरीकडे आगामी सणासुदींच्या पार्श्वभूमीवर देशात कोरोना नियमांचं पालन करावं असं आवाहनही केंद्र सरकारकडून करण्यात आलं आहे. दरम्यान, गेल्या चोवीस तासांत महाराष्ट्रात ३ हजार ५९५ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली.
तर दुसरीकडे चोवीस तासांत राज्यात ३ हजार २४० रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत राज्यात ६३ लाख २० हजार ३१० रुग्णांनी कोरोनावर मात केली. दरम्यान, राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर ९७.०६ टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये राज्यात एकूण ४५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर हा २.१२ टक्के इतका आहे.
#CoronavirusUpdates
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) September 16, 2021
16th September, 6:00pm
Positive Pts. (24 hrs) - 446
Discharged Pts. (24 hrs) - 431
Total Recovered Pts. - 7,13,605
Overall Recovery Rate - 97%
Total Active Pts. - 4654
Doubling Rate - 1279 Days
Growth Rate (9 September - 15 September) - 0.06%#NaToCorona
मुंबईत ४४६ रुग्णांची नोंद
मुंबईत गेल्या चोवीस तासांमध्ये ४४६ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर ४३१ रूग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचा दर ९७ टक्के इतका झाला आहे. सध्या मुंबईत ४ हजार ६५४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसंच मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी १२७९ दिवस इतका आहे.