Coronavirus Update : राज्यात ११ हजारांपेक्षा अधिक नव्या कोरोनाबाधितांची नोंद; ८ हजारांवर रुग्ण कोरोनामुक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2021 10:10 PM2021-06-11T22:10:07+5:302021-06-11T22:12:01+5:30
Coronavirus In Maharashtra : राज्यात ४०६ रुग्णांचा मृत्यू. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर ९५ टक्क्यांवर.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका हा महाराष्ट्राला बसला होता. सध्या कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत असून राज्य सरकारनंही काही प्रमाणात अनेक ठिकाणी निर्बंध शिथिल केले आहेत. दरम्यान, गेल्या चोवीस तासांत राज्यात ११ हजारांपेक्षा अधिक कोरोनाबाधितांची नोंद झाली असून ८ हजारांपेक्षा अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
राज्यात गेल्या चोवीस तासांमध्ये ११,७६६ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर दुसरीकडे ८,१०४ रूग्णांनी करोनावर मात केली आहे. तर गेल्या चोवीस तासांत राज्यात ४०६ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या १,६१,७०४ रुग्णांवर उपचार सुरू असून राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर ९५.४ टक्के इतका झाला आहे.
#CoronavirusUpdates
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) June 11, 2021
११ जून, संध्या. ६:०० वाजता
२४ तासात बाधित रुग्ण - ६९६
२४ तासात बरे झालेले रुग्ण - ६५८
बरे झालेले एकूण रुग्ण - ६८१९४६
बरे झालेल्या रुग्णांचा दर - ९५%
एकूण सक्रिय रुग्ण- १५८१९
दुप्पटीचा दर- ५९८ दिवस
कोविड वाढीचा दर ( ४ जून ते १० जून)- ०.११ % #NaToCorona
मुंबईत ६९६ नव्या कोरोनाबाधितांची नोंद
गेल्या चोवीस तासांत मुंबईत ६९६ नव्या कोरोबोनाधितांची नोंद झाली आहे. तर दुसरीकडे चोवीस तासांत ६५८ कोरोनाबाधितांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे. मुंबईत सध्या १५,८१९ रुग्णांवर उपचार सुरू असून रुग्ण बरे होण्याचा दर ९५ टक्के इतका आहे. तर रुग्ण दुपटीचा दर ५९८ दिवस इतका झाला आहे.