Coronavirus Update: २४ तासांत राज्यात २२ हजारांपेक्षा अधिक रुग्ण कोरोनामुक्त; रुग्ण बरे होण्याचा दर ९५ टक्क्यांवर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2021 08:22 PM2021-06-07T20:22:55+5:302021-06-07T20:29:52+5:30
Coronavirus : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव होतोय कमी. रुग्ण बरे होण्याचा दरही वाढला.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात हाहाकार माजला होता. दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसताना दिसला होता. परंतु आता गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं नव्या रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. तर दुसरीकडे कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. गेल्या चोवीस तासांत राज्यात २२ हजारांपेक्षा अधिक रुग्ण करोनामुक्त झाले असून रुग्ण बरे होण्याचा दरही ९५ टक्क्यांच्या वर गेला असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
गेल्या चोवीस तासांत राज्यात १०,२१९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर २२,०८१ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात सध्या १ लाख ७४ हजार ३२० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर रुग्ण बरे होण्याचा दरही ९५.२५ टक्क्यांवर पोहोचला असल्याची माहिती टोपे यांनी दिली.
राज्यात आज 10,219 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 22,081 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 55,64,348 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 1,74,320 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 95.25% झाले आहे. pic.twitter.com/fIUGsXxVM9
— Rajesh Tope (@rajeshtope11) June 7, 2021
#CoronavirusUpdates
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) June 7, 2021
7th June, 6:00pm
Positive Pts. (24 hrs) - 728
Discharged Pts. (24 hrs) - 980
Total Recovered Pts. - 6,79,258
Overall Recovery Rate - 95%
Total Active Pts. - 15,786
Doubling Rate - 550 Days
Growth Rate (31 May - 6 June) - 0.12%#NaToCorona
मुंबईतही कोरोनामुक्त रुग्ण अधिक
गेल्या चोवीस तासांत मुंबईत ७२८ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर ९८० रुग्णांनी कोरोनावर मात केली. मुंबईत आतापर्यंत ६,७९,२५८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत सध्या १५,७८६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर रुग्ण बरे होण्याचा दरही आता ९५ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर दुसरीकडे रुग्ण बरे होण्याचा कालावधी ५५० दिवसांवर पोहोचला आहे.