Coronavirus Update : राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ; मृत्यूंचा आकडाही वाढला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2021 09:38 PM2021-04-27T21:38:17+5:302021-04-27T21:40:17+5:30
Coronavirus In Maharashtra : राज्यात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ.
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. परंतु सोमवारी कोरोनाबाधितांची संख्या तुलनेनं कमी प्रमाणात वाढली होती. तर दुसरीकडे दिलासादायक बाब म्हणजे कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्याही अधिक होती. परंतु आता पुन्हा एकदा राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून गेल्या चोवीस तासांत राज्यात ६६,३५८ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. तर दुसरीकडे कोरोनामुळे झालेल्या मृतांच्या संख्येतही वाढ झाली. गेल्या चोवीस तासांत राज्यात ८९५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
एकीकडे गेल्या चोवीस तासांत राज्यात ६६,३५८ नव्या रुग्णांची वाढ झाली, तर दुसरीकडे ६७,७५२ जणांनी कोरोनावर मात केली. राज्यात सध्या ६,७२,४३४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर ८३.२१ टक्क्यांवर पोहोचला आहे. आतापर्यंत राज्यात एकूण ३६,६९,५४८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
Maharashtra reports 66,358 new cases, 895 deaths and 67,752 discharges today; case tally rises to 44,100,85 pic.twitter.com/oimeU1IsZS
— ANI (@ANI) April 27, 2021
#CoronavirusUpdates
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) April 27, 2021
27-Apr; 6:00pm
Positive Pts. (24 hrs) - 4,014
Discharged Pts. (24 hrs) - 8,240
Total Recovered Pts. - 5,55,101
Overall Recovery Rate - 87%
Total Active Pts. - 66,045
Doubling Rate - 68 Days
Growth Rate (20 Apr-26 Apr) - 1.01%#NaToCorona
मुंबईत कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त अधिक
गेल्या चोवीस तासांत मुंबईत ४,०१४ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर याच्या दुपटीपेक्षा अधिक लोकांनी कोरोनावर मात केली. गेल्या चोवीस तासांत मुंबईत ८,२४० जणांनी कोरोनावर मात केली. सध्या राज्यात ६६,०४५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचा दर आता ८७ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर रुग्ण दुपटीता कालावधी ६८ दिवस इतका झाला आहे.