Coronavirus Update : राज्यात रुग्णसंख्येत थोडी वाढ; चोवीस तासांत १२,२०७ कोरोनाबाधितांची नोंद
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2021 10:08 PM2021-06-10T22:08:15+5:302021-06-10T22:09:34+5:30
Coronavirus In Maharashtra : गेल्या चोवीस तासांत राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत झाली वाढ. ३९३ रुग्णांचा मृत्यू.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा महाराष्ट्राला सर्वाधिक फटका बसला होता. परंतु आता कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्यानं राज्य सरकारनं निर्बंधात काही सूट दिली आहे. परंतु गेल्या चोवीस तासांमध्ये पुन्हा एकदा नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत थो़डी वाढ झाली आहे. गेल्या चोवीस तासांत राज्यात १२,२०७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे.
गेल्या चोवीस तासांत राज्यात १२,२०७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर दुसरीकडे ११,४४९ कोरोनावर मात केली आहे. गेल्या चोवीस तासांत राज्यात ३९३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. राज्यात सध्या १,६०,६९३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर आता ९५.४५ टक्के इतका झाला आहे.
Maharashtra reports 12,207 new #COVID19 cases, 11,449 discharges, and 393 deaths in the last 24 hours.
— ANI (@ANI) June 10, 2021
Active cases 1,60,693
Case tally 58,76,087
Death toll 1,03,748
Total recovered cases 56,08,753 pic.twitter.com/HvdCnq6uYi
#CoronavirusUpdates
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) June 10, 2021
10th June, 6:00pm
Positive Pts. (24 hrs) - 660
Discharged Pts. (24 hrs) - 768
Total Recovered Pts. - 6,81,288
Overall Recovery Rate - 95%
Total Active Pts. - 15,811
Doubling Rate - 566 Days
Growth Rate ( 3June - 9 June) - 0.12%#NaToCorona
मुंबईत ६६० रुग्णांची वाढ
गेल्या चोवीस तासांत मुंबईत ६६० नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर ७६८ रुग्णआंनी कोरोनावर मात केली. मुंबईत सध्या १५,८११ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचा दर आता ९५ टक्क्यांवर पोहोचला असून रुग्ण दुपटीचा कालावधीही आता ५६६ दिवसांवर गेला आहे.