Coronavirus Updates: ७१ हजारांहून अधिक नागरिक कोरोनामुक्त; महाराष्ट्राला आधार देणारा आकडा, पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2021 09:11 PM2021-04-26T21:11:30+5:302021-04-26T21:14:02+5:30
Coronavirus In Maharashtra : गेल्या काही दिवसांच्या तुलनेत रुग्णवाढीत झाली मोठी घट. महाराष्ट्रातून दिलासा देणारी बातमी आली समोर
गेल्या काही दिवसांपासून राज्यात आणि देशात कोरोनाबाधितांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. परंतु आता राज्यातून एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या चोवीस तासांत कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. राज्यात गेल्या चोवीस तासांमध्ये ७१,७३६ जणांनी कोरोनावर मात केली. तर ४८,७०० नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर दुसरीकडे चोवीस तासांत ५२४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
गेल्या चोवीस तासांत राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोनामुक्त नागरिकांची नोंद झाली आहे. मुंबईतही मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची संख्या कमी झाली आहे. राज्यात आतापर्यंत एकूण ४३,४३,७२७ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर आतापर्यंत एकूण ३६,०१७९६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात सध्या ६,७४७७० जणांवर उपचार सुरू आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर आता ८२.९२ टक्क्यांवर पोहोचला आहे.
Maharashtra reports 48,700 new COVID-19 cases, 71,736 discharges and 524 deaths in the last 24 hours
— ANI (@ANI) April 26, 2021
Total cases: 43,43,727
Active cases: 6,74,770
Total discharges: 36,01,796
Death toll: 65,284 pic.twitter.com/9dvTWVCC6u
मुंबईतही कोरोनामुक्त अधिक
मुंबईत गेल्या चोवीस तासांमध्ये तब्बल ९,१५० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर कोरोनाबाधितांच्या संख्येतही घट झाली असून गेल्या चोवीस तासांत ३,८७६ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. मुंबईत सध्या ७०,३७३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर मुंबईतील रुग्णवाढीचा दर ६२ दिवसांवर पोहोचला असून रुग्ण बरे होण्याचा दर ८७ टक्क्यांवर पोहोचला आहे.
#CoronavirusUpdates
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) April 26, 2021
26-Apr; 6:00pm
Positive Pts. (24 hrs) - 3,876
Discharged Pts. (24 hrs) - 9,150
Total Recovered Pts. - 5,46,861
Overall Recovery Rate - 87%
Total Active Pts. - 70,373
Doubling Rate - 62 Days
Growth Rate (19 Apr-25 Apr) - 1.09%#NaToCorona
सहा दिवसांत ४ लाख ४२ हजार रुग्ण कोरोनामुक्त
कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर गेल्या सहा दिवसात राज्यभरात ४ लाख ४२ हजार ४६६ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. गेल्या चोवीस तासांत ७१ हजार ७३६ रुग्णांना घरी सोडण्यात आलं. त्यात सर्वाधिक १३ हजार ६७४ रुग्ण पुणे येथील आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
राज्यात गेल्या दोन महिन्यापासून दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येत विक्रमी वाढ होत आहे. दररोज किमान ६० हजारांच्या आसपास नविन रुग्णांची नोंद होत आहे. आठवडाभरापूर्वी १८ एप्रिलला आतापर्यंतची सर्वाधिक ६८ हजार ६३१ इतके रुग्ण एकाच दिवशी आढळून आले होते. आठवडाभरानंतर मात्र रुग्णसंख्येत जास्तीची वाढ झालेली आढळून आली नाही. मात्र दैनंदिन रुग्णसंख्या स्थिर आहे. त्याप्रमाणात कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे, ही दिलासा देणारी बाब ठरली आहे. आरोग्य यंत्रणेतील डॉक्टर्स, नर्स यांच्या प्रयत्नांमुळे रुग्णांना कोरोनामुक्त होण्यासाठी बळ मिळत आहे. दैनंदिन नविन रुग्णांच्या संख्येइतकेच बरे होणाऱ्यांची संख्या असल्यानं नागरिकांच्या मनावरील ताण काहीसा कमी होताना दिसून येत आहे. गेल्या सहा दिवसातील कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या पाहिल्यास त्याची प्रचिती येते, असंही त्यांनी नमूद केलं.