Exclusive : अनेक जिल्ह्यांत लागला ब्रेक; राज्यात सरासरी केवळ २९.९२ टक्के लसीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2021 05:29 AM2021-07-13T05:29:07+5:302021-07-13T05:32:56+5:30

Coronavirus Vaccination : पहिला डोस घेणारे २ कोटी ७० लाख नागरिक. तर दुसरा डोस घेणारे केवळ ८२ लाख.

Coronavirus Vaccination Break in several districts The average vaccination rate in the state is only 29 92 percent | Exclusive : अनेक जिल्ह्यांत लागला ब्रेक; राज्यात सरासरी केवळ २९.९२ टक्के लसीकरण

संग्रहित छायाचित्र

googlenewsNext
ठळक मुद्देपहिला डोस घेणारे २ कोटी ७० लाख नागरिक.तर दुसरा डोस घेणारे केवळ ८२ लाख.

मुंबई : राज्यात लसीकरणाला पुन्हा मोठा ब्रेक लागला असून अनेक जिल्ह्यांत गेल्या आठवड्यात लसीकरण ठप्प होते. सोमवारपासून लस उपलब्ध झाल्यानंतर लसीकरण पुन्हा सुरू झाले. आतापर्यंत पहिला व दोन्ही डोस घेणाऱ्यांची सरासरी टक्केवारी २९.९२ अशी आहे. अनेक जिल्ह्यांत पहिला डोस घेणाऱ्यांना ८४ दिवस झाल्यानंतरही १० ते १५ दिवस लस मिळत नसल्याचे वास्तव लोकमतच्या पाहणीत समोर आले. 

पहिल्या पाच जिल्ह्यांत भंडारा, सिंधुदुर्ग, चंद्रपूर, कोल्हापूर, बीड व नागपूर यांचा समावेश आहे. तर औरंगाबाद, नाशिक, पुणे, जळगाव व पालघर हे पाच जिल्हे तळात आहेत. मुंबईत तीन दिवस लसीकरण बंद होते, सोमवारी लसीकरण सुरू झाले. खासगी रुग्णालयात लस आहे, मात्र लसीकरण केंद्रांमध्ये लस नाही, अशी स्थिती मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई या महानगर प्रदेशात आहे.

कोव्हॅक्सिनचा प्रश्न
कोव्हॅक्सिन लस सहज उपलब्ध होत नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळे कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेतलेल्यांना दुसरा डोस मिळत नसल्याचे चित्र आहे.

केंद्रांवर विचित्र स्थिती
कुठे तरुणांना लस मिळत आहे, तर ज्येष्ठांना दुसऱ्या डोसची प्रतीक्षा आहे. कुठे ४५ ते ६० या वयोगटाला लस आहे, तर इतरांना नाही अशीही विचित्र स्थिती आहे.

मुंबईत दुसरा डोस घेणारे केवळ १२ लाखांवर

  • मुंबईत आतापर्यंत ६० लाखांवर लसीकरण झाले आहे. 
  • त्यात ४७ लाखांवर पहिला डोस घेणारे आहेत, मात्र दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या केवळ १२ लाखांवर आहे. 
  • दोन्ही डोस घेतलेल्यांमध्ये महिला (४४%) तर पुरुषांचे प्रमाण ५५% आहे.

Web Title: Coronavirus Vaccination Break in several districts The average vaccination rate in the state is only 29 92 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.