CoronaVirus Vaccine: राज्यात 3 कोटी लोकांना लस; पहिल्या टप्प्यासाठी योजना तयार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2020 04:36 AM2020-12-18T04:36:20+5:302020-12-18T06:38:47+5:30

केंद्र सरकारने यासाठी को-विन हे ॲप तयार केले आहे. सर्व राज्यांकडून त्यासाठीची माहिती मागविली आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवा कर्मचारी, अधिकारी, डॉक्टर्स, नर्सेस, कोरोनाच्या लढ्यातील सर्व अधिकारी, कर्मचारी, पोलीस आणि ५० पेक्षा जास्त वय असणारे नागरिक यांना लस दिली जाईल.

CoronaVirus Vaccine will be given to 3 crore people in the state | CoronaVirus Vaccine: राज्यात 3 कोटी लोकांना लस; पहिल्या टप्प्यासाठी योजना तयार

CoronaVirus Vaccine: राज्यात 3 कोटी लोकांना लस; पहिल्या टप्प्यासाठी योजना तयार

Next

मुंबई : महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात कोरोनाची लस तीन कोटी लोकांना देण्यात येईल. त्यादृष्टीने राज्यभर कोल्ड चेन उभी करण्याचे काम पूर्ण झाले आहे. केंद्राकडून त्यासाठीचे एसएमएस टप्प्याटप्प्याने येतील. त्यानुसार संबंधितांना लस देण्याचे काम पूर्ण होईल, अशी माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

केंद्र सरकारने यासाठी को-विन हे ॲप तयार केले आहे. सर्व राज्यांकडून त्यासाठीची माहिती मागविली आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवा कर्मचारी, अधिकारी, डॉक्टर्स, नर्सेस, कोरोनाच्या लढ्यातील सर्व अधिकारी, कर्मचारी, पोलीस आणि ५० पेक्षा जास्त वय असणारे नागरिक यांना लस दिली जाईल. त्यासाठीची माहिती गोळा करून ॲपवर अपलोड करणे पूर्ण झाले आहे. येऊ घातलेली लस कशा पद्धतीने द्यायची, त्याची तयारी, आवश्यक प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. मतदान केंद्र रचनेप्रमाणे बूथ तयार करून व्हॅक्सिनेशन केले जाईल, असे टोपे यांनी स्पष्ट केले.

सरसकट प्रत्येकाला लस दिली जाणार का?
 टोपे म्हणाले, ज्यांना प्राधान्याने लस देण्याची गरज आहे, अशांना लस आधी देण्यात येईल. त्यासाठी सगळी माहिती केंद्र सरकारने तयार केलेल्या ॲपवर नोंदवावी लागते. 
 नोंद झाल्यानंतर संबंधितांना कोणत्या भागात, कोणत्या ठिकाणी लस दिली जाईल याचे मेसेज येतील. ते मेसेज आणि शासनाने मान्य केलेल्या ओळखपत्रांपैकी कोणतेही एक ओळखपत्र दाखविल्यानंतर त्यांना लस मिळेल. 
 कोणीही दबावतंत्राचा वापर करून लस मिळावी यासाठी प्रयत्न करू नये, त्याचा काहीही उपयोग होणार नाही, असेही त्यांनी सांगितले. 
 शासकीय रुग्णालयांमधून रक्त मोफत दिले जात आहे. रक्ताचा तुटवडा होऊ नये म्हणून केलेल्या आवाहनाला राज्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. 
३१ डिसेंबरपर्यंत राज्यातल्या ५०० ब्लड बँक रक्त संकलनाचे काम करण्यासाठी व्यस्त झाल्या आहेत.

Web Title: CoronaVirus Vaccine will be given to 3 crore people in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.