CoronaVirus News: व्हीनस, मॅग्नम कंपन्यांनी केली मास्कची साठेबाजी; शासनाच्या समितीने ठेवला गंभीर ठपका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2020 06:51 AM2020-10-08T06:51:03+5:302020-10-08T07:26:48+5:30

CoronaVirus face mask News: भारतात एन ९५ मास्क बनवणाऱ्या व्हिनस आणि मॅग्नम या दोन मोठ्या कंपन्या आहेत. नॅशनल इन्स्टीट्यूट फॉर ऑक्यूपेशनल सेफ्टी अ‍ॅन्ड हेल्थ ही अमेरिकेची मास्क प्रमाणित करणारी मान्यताप्राप्त संस्था आहे.

CoronaVirus Venus and Magnum stockpile masks says government committee | CoronaVirus News: व्हीनस, मॅग्नम कंपन्यांनी केली मास्कची साठेबाजी; शासनाच्या समितीने ठेवला गंभीर ठपका

CoronaVirus News: व्हीनस, मॅग्नम कंपन्यांनी केली मास्कची साठेबाजी; शासनाच्या समितीने ठेवला गंभीर ठपका

Next

- अतुल कुलकर्णी

मुंबई : व्हीनस आणि मॅग्नम या दोन कंपन्यांनी साठेबाजी करून वस्तूंची कृत्रिम भाववाढ केली. ही बाब कायद्याचा भंग करणारी आहे, त्यामुळे विविध कायद्यांअंतर्गत सक्षम अधिकाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आणावी व त्यांच्यावर कारवाई करावी, अशी शिफारस मास्कचे दर ठरवणाºया समितीने केली आहे.

मास्कची साठेबाजी करून नफा कमावण्याचा व्हीनस कंपनीचा हेतू होता, चौकशीसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांना माहिती देण्यास या कंपनीने मुद्दामच विलंब केला, वारंवार विनंत्या व स्मरणपत्रे देऊनही त्यांनी जाणीवपूर्वक विलंब केला, कॉस्ट ऑडिटरने व चौकशीसाठी गेलेल्या अधिकाºयांनी मागितलेली माहिती जतन करणे, निदर्शनास आणणे व सादर करणे बंधनकारक असताना कंपनीने तसे केले नाही, अशा अनेक गंभीर बाबी समितीने समोर आणल्या आहेत.

भारतात एन ९५ मास्क बनवणाऱ्या व्हिनस आणि मॅग्नम या दोन मोठ्या कंपन्या आहेत. नॅशनल इन्स्टीट्यूट फॉर ऑक्यूपेशनल सेफ्टी अ‍ॅन्ड हेल्थ ही अमेरिकेची मास्क प्रमाणित करणारी मान्यताप्राप्त संस्था आहे. या दोन कंपन्या एन ९५ मास्कचे उत्पादन या कंपनीच्या प्रमाणित मास्कचे उत्पादन करतात. त्यामुळे त्यांची यात मक्तेदारी आहे. या उत्पादनांच्या किंमतीमध्ये दोन मोठ्या उत्पादकांनी केलेल्या वाढीचा आलेख व त्यांची साधलेली वेळ पहाता या दोन कंपन्यांनी साठेबाजी करुन वस्तूंची कृत्रीम भाववाढ केली व ही बाब स्पर्धांच्या कायद्याचा भंग करणारी आहे, त्यामुळे विविध कायद्यांअंतर्गत सक्षम अधिकाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आणावी असेही समितीने अहवालात स्पष्ट केले आहे. व्हिनस कंपनीने तपासात कोणतेही सहकार्य केले नाही. मागितलेली माहिती दिली नाही, असेही अहवालात म्हटले आहे.

भाववाढ अवास्तव : मास्क आणि सॅनिटायझर यांच्या बहुतांश कच्च्या मालांच्या किंमती अत्यावश्यक वस्तू कायद्याखाली नियंत्रित करुन देखील या उत्पादक कंपन्यांनी मास्कच्या किंमती अवास्तव व अतार्किक प्रमाणात वाढवल्या. मास्कच्या कमाल किंमतीत २५ ते १७२ रुपये अशी वाढ छोट्या व मध्यम रुग्णालयांच्या, तसेच सामान्य जनतेच्या क्रयशक्तीच्या पलीकडे आहे. अशाप्रकारची तीव्र वाढ अत्यावश्यक वस्तू कायद्याच्या मूलभूत तत्वांच्या विरोधी असल्याचे समितीने म्हटले आहे.

राजकीय लागेबांधे
मास्क बनवण्यासाठी लागणाºया कच्च्या मालाच्या किमतीत कुठेही वाढ झालेली नसताना या दोन कंपन्यांनी मास्कच्या किमतीत भरमसाट वाढ केल्याचा निष्कर्ष समितीने काढला आहे. यातल्या एका कंपनीचे राजकीय पक्षाच्या नेत्याशी लागेबांधे असल्यामुळे या गोष्टी होत गेल्या, असेही एका ज्येष्ठ अधिकाºयाने सांगितले.

Web Title: CoronaVirus Venus and Magnum stockpile masks says government committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.