CoronaVirus: राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या का वाढली?; मुख्यमंत्र्यांनी सांगितलं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2020 02:08 PM2020-04-08T14:08:43+5:302020-04-08T14:28:01+5:30

CoronaVirus कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा राज्यातील जनतेशी संवाद

coronavirus we have increased number of test to fight covid 19 says cm uddhav thackeray kkg | CoronaVirus: राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या का वाढली?; मुख्यमंत्र्यांनी सांगितलं कारण

CoronaVirus: राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या का वाढली?; मुख्यमंत्र्यांनी सांगितलं कारण

Next

मुंबई: गेल्या काही दिवसांत राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्यानं वाढत आहे. देशात सर्वाधिक कोरोनाबाधित महाराष्ट्रात आहे. याच पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यातल्या जनतेशी संवाद साधला. रुग्णांची संख्या नेमकी कशामुळे वाढतेय, हे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. परिस्थिती नक्की नियंत्रणात येईल. तुम्ही मला अशीच साथ देत राहा, असं आवाहन यावेळी मुख्यमंत्र्यांनी केलं.

गेल्या काही दिवसांमध्ये रुग्णांची संख्या वेगानं वाढतेय. हे प्रमाण आपल्याला शून्यावर आणायचं आहे. मात्र रुग्णसंख्येच्या वाढीमागचं कारण समजून घ्यायला हवं, असं मुख्यमंत्री म्हणाले. आपण आता रुग्ण रुग्णालयात दाखल होण्याची वाट पाहत नाही. तर घरोघरी जाऊन लोकांच्या चाचण्या करत आहोत. चाचण्यांची संख्या आपण मोठ्या प्रमाणात वाढवली आहे. त्यामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचं दिसतंय, असं मुख्यमंत्री म्हणाले. कोरोनाग्रस्तांना लवकर उपचार मिळावेत आणि त्यांच्या संपर्कात आल्यानं इतरांना कोरोनाची लागण होऊ नये यासाठी घरोघरी जाऊन चाचण्या करण्यावर भर देत असल्याचं त्यांनी सांगितलं.

कोरोनाचा धोका मोठा आहे. राज्यातील आरोग्य यंत्रणा या आव्हानाचा मोठ्या हिमतीनं सामना करत आहे. मात्र आव्हानाची तीव्रता पाहता राज्यातील प्रशिक्षित नर्सेच, वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या व्यक्तींनी तसंच लष्करातून निवृत्त झालेल्या आणि वैद्यकीय सेवेचा अनुभव असलेल्या जवानांनी पुढे यावं. आज महाराष्ट्राला तुमची गरज आहे, अशी साद मुख्यमंत्र्यांनी घातली. कोरोनाविरोधात आपण लढाई लढत आहोत. या लढाईमध्ये अनेकांची साथ लागणार आहे. आपल्या राज्यात जे प्रशिक्षित नर्स, रुग्णालय कर्मचारी आहेत, त्यांच्यापैकी जे कुणी सेवेत नसतील. त्यांनी या लढाईत लढण्याची मानसिक इच्छा असेल तर पुढे यावं. तसेच लष्करातील निवृत्त जवान ज्यांना वैद्यकीय सेवेचा अनुभव आहे त्यांनी सेवा देण्यासाठी पुढाकार घ्यावा. अशा प्रकारच्या सेवेत यायची ज्यांची इच्छा असेल त्यांनी Covidyoddha@gmail.com या संकेतस्थळावर अर्ज पाठवावा असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं.

 

Read in English

Web Title: coronavirus we have increased number of test to fight covid 19 says cm uddhav thackeray kkg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.