coronavirus: कोरोनाच्या अग्निपरीक्षेतून बाहेर पडल्याशिवाय अंतिम वर्षाच्या परीक्षा कशा घ्यायच्या? शिवसेनेचा राज्यपालांना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2020 07:59 AM2020-05-25T07:59:00+5:302020-05-25T08:24:06+5:30

परवा शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतल्यानंतर आज शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीकेचे बाण सोडले आहेत.

coronavirus: What does this interfere mean? Shiv sena criticize governor BKP | coronavirus: कोरोनाच्या अग्निपरीक्षेतून बाहेर पडल्याशिवाय अंतिम वर्षाच्या परीक्षा कशा घ्यायच्या? शिवसेनेचा राज्यपालांना सवाल

coronavirus: कोरोनाच्या अग्निपरीक्षेतून बाहेर पडल्याशिवाय अंतिम वर्षाच्या परीक्षा कशा घ्यायच्या? शिवसेनेचा राज्यपालांना सवाल

Next
ठळक मुद्देकोरोनामुळे २०२० हे वर्षच जीवनातून नष्ट झाले आहे. इतका वाईट काळ कधी आला नव्हता. सर्वच वाया गेले तिथे शैक्षणिक वर्ष तरी कसे वाचेलमहाराष्ट्राच्या राज्यपालांनी अंतिम वर्षाच्या परीक्षा घ्याच, असा आग्रह मुख्यमंत्र्यांकडे धरला आहेमहाराष्ट्रात विद्यार्थी संख्या १० लाखांच्या घरात आहे. त्यामुळे सर्व नियमांचे पालन करून  परीक्षा घेणे अवघड होईल.

मुंबई - पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांवरून राज्यपाल आणि राज्य सरकार आमने-सामने आले आहेत. परवा शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतल्यानंतर आज शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीकेचे बाण सोडले आहेत. या लुडबुडीच अर्थ काय? असा सवालही या अग्रलेखामधून उपस्थित करण्यात आला आहे.

सामनाच्या आजच्या अग्रलेखात म्हटले आहे की, कोरोनामुळे २०२० हे वर्षच जीवनातून नष्ट झाले आहे. इतका वाईट काळ कधी आला नव्हता. सर्वच वाया गेले तिथे शैक्षणिक वर्ष तरी कसे वाचेल. तेही वाया जाताना दिसत आहे. त्यात महाराष्ट्राच्या राज्यपालांनी अंतिम वर्षाच्या परीक्षा घ्याच, असा आग्रह मुख्यमंत्र्यांकडे धरला आहे. हा वाद उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे झाला आहे. मुळात हा वाद नाही. सामंत यांनी आपले मत व्यक्त केलेय.

महाराष्ट्रात विद्यार्थी संख्या १० लाखांच्या घरात आहे. त्यामुळे सर्व नियमांचे पालन करून  परीक्षा घेणे अवघड होईल. सध्या देशात जशी आरोग्य आणीबाणी आहे तशीच शैक्षणिक आणीबाणीसुद्धा आहे. त्या पार्श्वभूमीवर सामंत यांनी सरळसोट भूमिका घेतली आहे. त्यासंदर्भात त्यांनी यूजीसीला पत्र लिहिले आहे.  त्यावरून राजभवनास अंधारात ठेवले, असे राज्यपालांचे मत आहे. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राज्यातील अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याबाबत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. ती त्यांची तळमळ आहे. पण तिला व्यावहारिक रूप कसे द्यायचे, असा सवालही सामनामधून राज्यपालांसमोर  उपस्थित करण्यात आला आहे.

राज्यातील शाळा, कॉलेज, विद्यापीठे बंद आहेत. हे चित्र देशभर किंवा जगभर आहे. मुंबई विद्यापीठांतर्गत ठाणे, कोकणसह मोठा भाग येतो, तेथील परिस्थिती राजभवनास अवगत नसावी? कोरोनासमोर सगळ्यांनीच हात टेकले. तिथे विद्यापीठे काय करणार? 10 लाख विद्यार्थी  परीक्षा केंद्रांवर येणार कसे? त्यांची व्यवस्था कशी करायची? कर्मचारी, प्राध्यापक, शिक्षक पोहोचणार कसे? परीक्षांच्या माध्यमातून कोरोनाचे संक्रमण वाढले तर कसे करायचे? अशी विचारणा या अग्रलेखामधून करण्यात आली आहे.

सध्या अनेक शैक्षणिक संस्था राज्य सरकारने ताब्यात घेतल्या आहे. अशा परिस्थितीत परीक्षा केंद्रे कुठे निर्माण करायची?  संघप्रणित एबीव्हीपीनेही परीक्षांना विरोध केलाय. गुजरात गोव्यामध्ये भाजपाप्रणित विद्यार्थी संघटनांनी आधीच भूमिका जाहीर केली आहे.महाराष्ट्रात भाजपाविरोधी पक्ष सत्तेत आहे, म्हणून विरुद्ध भूमिका घेतली जात आहे का? असा सवालही शिवसेनेने विचारला आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या  

उद्धव ठाकरे आणि राज्यपालांमधील संबंधांबाबत संजय राऊत यांचे भाष्य, म्हणाले... 

कोरोनामुळे निर्माण झालेल्या तणावादरम्यान अमेरिकेचा चीनला तगडा धक्का, केली मोठी कारवाई 

लॉकडाऊन आणि मंदीचे सावट असतानाही ही कंपनी करणार ५० हजार कर्मचाऱ्यांची मेगाभरती 

रामजन्मभूमीचे सपाटीकरण करताना सापडले प्राचीन मंदिराचे अवशेष
 

पदव्यांशिवाय परीक्षा ही कल्पना महाराष्ट्राच्या शैक्षणिक परंपरेस परवडणारी नाही. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर त्याचा परिणाम होऊ शकतो. सध्या राज्यपालांना महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेची चिंता लागून राहिली आहे. त्यामुळे त्यांनीच यामधून मार्ग काढायला हवा. पण कोरोनाच्या अग्निपरीक्षेतून बाहेर पडल्याशिवाय विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा कशा घ्यायच्या? अशी विचारणा अग्रलेखातून करण्यात आली आहे. तसेच राज्याच्या उच्च शिक्षणमंत्र्यांनी राज्यपालांशी चर्चा करून याबाबत आंतिम निर्णय घ्यावा. महाराष्ट्र आज कोरोनाशी लढत आहे. त्या लढ्यात दहा लाख विद्यार्थ्यांची परीक्षा घेणे म्हणजे नव्या संकटाची चाहूल ठरू नये, असा सल्लाही सामनामधून देण्यात आला आहे.

Web Title: coronavirus: What does this interfere mean? Shiv sena criticize governor BKP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.