coronavirus : चिंता वाढली, राज्यात आज एका दिवसात सापडले कोरोनाचे 778 रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2020 09:08 PM2020-04-23T21:08:36+5:302020-04-23T21:42:30+5:30

आज दिवसभरात राज्यात एकूण 778 नव्या रुग्णांची नोंद झाल्याने राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 6 हजारांच्या पलीकडे पोहोचला आहे.

coronavirus: worry increased in Maaharashtra, 778 corona patients found in the state today in one day BKP | coronavirus : चिंता वाढली, राज्यात आज एका दिवसात सापडले कोरोनाचे 778 रुग्ण

coronavirus : चिंता वाढली, राज्यात आज एका दिवसात सापडले कोरोनाचे 778 रुग्ण

googlenewsNext

मुंबई - राज्यात कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांचे प्रमाण  मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आज दिवसभरात राज्यात एकूण 778 नव्या रुग्णांची नोंद झाल्याने राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 6 हजारांच्या पलीकडे पोहोचला आहे. आज सापडलेले 778 रुग्ण हा राज्यात एका दिवसात सापडलेल्या रुग्णांचा सर्वाधिक आकडा आहे. तसेच राज्यात आज दिवसभरात कोरोनामुळे 14 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. 

कोरोनाला रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन, सोशल डिस्टंसिंगची अंमलबजावणी करण्यात  येत आहे. तसेच आरोग्य यंत्रणा युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. मात्र असे असले तरी राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा चिंताजनक पातळीवर वाढत आहे. आज दिवसभारत राज्यात कोरोनाचे 778 नवे रुग्ण सापडले. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 6427 वर पोहोचला आहे. तसेच आज दिवसभरात कोरोनामुळे 14 जणांचा मृत्यू झाल्याने राज्यातील कोरोनामुळे झालेल्या मृत्यूची संख्या 283 इतकी झाली आहे.  राज्यात गुरुवारी १४ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला, त्यात मुंबईतील सहा , पुणे येथील पाच, नवी मुंबई, नंदूरबार आणि धुळे मनपा येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. १४ मृत्यूंपैकी आठ पुरुष तर सहा महिला आहेत. गुरुवारी झालेल्या मृत्यूंपैकी ६० व त्यावरील दोन रुग्ण आहेत. तर नऊ रुग्ण हे ४० ते ५९ वयोगटातील आहेत. तीन रुग्ण ४० वर्षांखालील आहेत. दोन रुग्णांबाबत अन्य आजारांची माहिती मिळू शकली नाही, उर्वरित १२ मृत्यूंपैकी सात रुग्णांमध्ये ५८ टक्के मधुमेह, उच्चरक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आहेत.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ९६ हजार ३६९ नमुन्यांपैकी ८९ हजार ५६१ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहेत. आजपर्यंत राज्यातून ८४० कोरोना रुग्णांना बरे होऊन घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात १ लाख १४ हजार ३९८ लोक घरगुती अलगीकऱण तर ८ हजार ७०२ लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

राज्यात १ लाख ६१ हजार खाटांची तयार

सध्या राज्यात अधिकृत कोविड रुग्णालय २०८, तर अधिकृत कोविड रुग्णालय व निगा केंद्र ४८३ आहेत. तर कोविड रुग्ण निगा केंद्र ८७२ आहेत. या एकूण १ हजार ५६३ रुग्णालयांमध्ये १ लाख ६१ हजार ४९९ खाटा तयार ठेवण्यात आल्या आहेत. या रुग्णालयांमध्ये ६ हजार ७७ एवढी अतिदक्षता विभागातील खाटा असून एकूण २ हजार ५०९ व्हेंटीलेटर्स उपलब्ध आहेत.

Web Title: coronavirus: worry increased in Maaharashtra, 778 corona patients found in the state today in one day BKP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.