CoronaVirus योगी सरकारचा मजुरांना ठेंगा पण विद्यार्थ्यांच्या प्रवासाला ग्रीन सिग्नल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2020 08:22 PM2020-05-05T20:22:58+5:302020-05-05T20:30:22+5:30
केंद्र सरकारने सर्वच राज्यांना आपले मजूर तसेच कामगार यांना आपल्या गावी पाठवण्यात यावे असा आदेश काढला होता. मजूर कामगार यांना न स्वीकारणारे उत्तर प्रदेश सरकारने मात्र नवोदय विद्यालयाच्या २१ विद्यार्थ्यांना तसेच ३ शिक्षकांना स्वीकारण्याचे ठरवले असून, सावंतवाडीतून सोमवारी रात्री उशिरा एक बस उत्तर प्रदेशकडे रवाना झाली आहे.
- अनंत जाधव
सावंतवाडी : उत्तर प्रदेश सरकारने आपल्या मजूर कामगारांना स्वीकारणार नसल्याचे जाहीर करत तसे पत्रच महाराष्ट्र सरकारला दिल्यानंतर याचे राजकारण चांगलेच पेटले आहे. या विषयावरून महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू झाले असतानाच महाराष्ट्रासाठी पहिल्यांदाच आनंददायी बातमी आली असून, उत्तर प्रदेश सरकारने महाराष्ट्रात अडकलेल्या विद्यार्थ्यांना मात्र स्वीकारण्याचे ठरवले आहे. त्यामुळेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातून २१ मुलांना घेउन जाणारी पहिली बस सोमवारी रात्री सावंतवाडीतून सुटली आहे. या बसला प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांनी हिरवा झेंडा दाखवला. या बसमध्ये मुलांसोबत तीन शिक्षकही आहेत.
केंद्र सरकारने सर्वच राज्यांना आपले मजूर तसेच कामगार यांना आपल्या गावी पाठवण्यात यावे असा आदेश काढला होता. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने परराज्यातील मजूर कामगार यांची यादी सुध्दा तयार केली होती. मात्र दोन दिवसापूर्वी उत्तरप्रदेश सरकारने महाराष्ट्रात अडकलेल्या मजूर कामगार यांना स्वीकारणार नाही. असे जाहीर केल्याने वादाची ठिणगी पडली आहे. मजूर कामगार न स्वीकारत नसल्याने महाविकास आघाडी व भाजप यांच्यात आरोप प्रत्यारोप ही सुरू झाले आहेत.
मात्र हे आरोप प्रत्यारोप सुरू असतनाच सिंधुदुर्गसाठी आनंदाची बातमी आली असून, मजूर कामगार यांना न स्वीकारणारे उत्तर प्रदेश सरकारने मात्र नवोदय विद्यालयाच्या २१ विद्यार्थ्यांना तसेच ३ शिक्षकांना स्वीकारण्याचे ठरवले असून, सावंतवाडीतून सोमवारी रात्री उशिरा एक बस उत्तर प्रदेशकडे रवाना झाली आहे. या बसला सावंतवाडीचे प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांनी हिरवा झेंडा दाखवला आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
कारण हे लॉकडाउन झाल्यापासून सावंतवाडी तालुक्यातील सांगेली येथील नवोदय विद्यालयात अडकून पडले होते. या विद्यार्थ्यांचे आई वडिलही चिंतेत होते. ते सतत येथील जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात होते. मात्र त्यांना आपली मुले केव्हा येणार याची प्रतिक्षा करण्याशिवाय त्यांच्याकडे काही नव्हते. केंद्र सरकारने चार दिवसापूर्वी राज्यात अडकून पडलेल्यांना आपल्या घरी सोडण्याचे आदेश सर्व सरकारना दिले खरे पण उत्तर प्रदेशने आपण बाहेरील मजुरांना तसेच कामगारांना स्वीकारणार नाही, अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या आई वडिलांच्या चिंतेत आणखी भर पडली होती.
या सर्व घडामोडीच्या पार्श्वभूमीवर अखेर सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के.मंजूलक्ष्मी यांच्यासह सावंतवाडीचे प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांनी महाराष्ट्र तसेच उत्तर प्रदेश सरकारच्या महत्वाच्या अधिकाºयांशी संपर्क करून या मुलांना अखेर उत्तर प्रदेशकडे रवाना केले. तत्पूर्वी या विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली. त्यांच्यासाठी ई पास तयार करण्यात आले. त्यानंतरच शासनाने त्यांना जाण्याची परवानगी दिली आहे. एसटी बस बरोबर अतिरिक्त चालक तसेच मॅकानिक ही पाठवण्यात आले आहेत.
उत्तर प्रदेश सरकारने पहिल्यांदाच मुलांना स्वीकारले :खांडेकर
उत्तर प्रदेश सरकारने महाराष्ट्रासह अन्य राज्यातून येणारे कामगार, ूमजूर यांना उत्तर प्रदेशात घेतले जाणार नाही, अशा प्रकारचे पत्र राज्य सरकारला दोन दिवसांपूर्वी दिले होते. मात्र असे असतानाही सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी विशेष मेहनत घेतल्याने हे सर्व शक्य झाल्याचे सावंतवाडीचे प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या...
CoronaVirus धक्कादायक! आंब्याची वाहतूक करणाऱ्या चालकाला कोरोना; सिंधुदुर्गात खळबळ
CoronaVirus अर्थव्यवस्था पुन्हा सुरु करण्यासाठी पंतप्रधानांना राहुल गांधींचा सल्ला
किंग जोंग उन 'प्रकट' काय झाले, रशियाने थेट वॉर मेडलने सन्मानित केले
चिंता वाढली! आज देशात सर्वाधिक कोरोनाग्रस्तांचा मृत्यू; २४ तासांत ३९०० नवे रुग्ण
दारु विक्रीतून राज्यांना उत्पन्न किती? आकडा पाहूनच 'झिंगाट' व्हाल