Coronil: रामदेव बाबांच्या कोरोनिल औषधावर ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2020 09:36 AM2020-06-25T09:36:57+5:302020-06-25T12:49:13+5:30

य़ोगगुरु रामदेव बाबांच्या या कोरोनिल औषधावरून आता राज्यांनी सक्त पाऊले उचलली आहेत. महाराष्ट्र सरकारचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याबाबत सरकारची भूमिका मांडली आहे.

Coronil: Maharashtra won't allow sale of Coronil spurious medicine: Anil Deshmukh | Coronil: रामदेव बाबांच्या कोरोनिल औषधावर ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

Coronil: रामदेव बाबांच्या कोरोनिल औषधावर ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

Next

मुंबई : पतंजलीचे बाबा रामदेव यांनी कोरोनावर 100 टक्के मात करणारे कोरोनिल औषध लाँच केले होते. यावरून वाद निर्माण झाल्याने आयुष मंत्रालयाने या दिव्य कोरोना किटच्या जाहिरातीवर बंदी आणली होती. तर राजस्थान सरकारने यापुढचे पाऊल उचलताना गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, महाराष्ट्र सरकारचे मंत्री अजित पवार यांनी ज्यांचा विश्वास असेल त्यांनी मागवावे अशी भुमिका जाहीर केली होती. मात्र, आता याबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. 


य़ोगगुरु रामदेव बाबांच्या या कोरोनिल औषधावरून आता राज्यांनी सक्त पाऊले उचलली आहेत. महाराष्ट्र सरकारचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याबाबत सरकारची भूमिका मांडली आहे. मध्यरात्रीनंतर ट्विट करून महाराष्ट्र सरकारचा निर्णय जाहीर केला आहे. कोरोनिलच्या क्लिनिकल ट्रायलबाबत काही माहिती उपलब्ध नाहीय. जयपूरची एनआयएमएस संस्था याचा तपास करत आहे. यामुळे अशा धोकादायक औषधाला महाराष्ट्र सरकार कधीही परवानगी देणार नाही. यामुळे महाराष्ट्रात या औषधाच्या विक्रीवर बंदी घालण्यात येत आहे, असे देशमुख यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी या ट्विटमध्ये लोकांच्या आयुष्याशी खेळ नको, अशा आशयाचा हॅशटॅग वापरला आहे. 



राजस्थान सरकारनंतर कोरोनिल औषधावर बंदी आणणारे महाराष्ट्र दुसरे राज्य आहे. आयुष मंत्रालयाचीच जर परवानगी नसेल तर कोणत्याही आयुर्वेदिक औषधाच्या विक्रीला राज्यात बंदी असल्याचे राजस्थानने जाहीर केले होते. 


अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
रामदेव बाबांनी कोरोनावर लाँच केलेल्या औषधावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली होती. रामदेव बाबांच्या औषधावर ज्यांचा विश्वास आहे, त्यांनीच घ्यावं, असं मत अजित पवार यांनी व्यक्त केले होते. 


रामदेव बाबांनी केली सरकारचीही फसवणूक
उत्तराखंडच्या आयुर्वेद ड्रग्स लायसन्स प्राधिकरणाने पंतजलीच्या कोरोनिल औषधावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत. प्राधिकरणाचे उपनिर्देशक यतेंद्र सिंह रावत म्हणाले की, बाबा रामदेव यांच्या पतंजली कंपनीला कोरोनाचे औषध नव्हे तर इम्युनिटी बूस्टर आणि सर्दी-खोकल्याचं औषध म्हणून परवाना जारी केला होता. पतंजलीने कोरोनावर औषध आणल्याचा दावा केला असल्याचं मीडियातून समजलं असं अधिकाऱ्यांनी सांगितले. 

अन्य महत्वाच्य़ा बातम्या...

India China FaceOff: चीनचे काम तमाम! कस्टम विभागाने मोठी आघाडी उघडली; कंटेनर रोखले

बाबो! तब्बल 841 किमीच्या स्पीडने महिलेने कार पळवली; मृत्यूनंतर गिनिज बुकात नोंद

बहिष्काराचा धसका! Xiaomi ने दालनांवरील लोगो झाकले; 'Made in India' लिहिले

Coronil: रामदेव बाबांच्या कोरोनिल औषधावर ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

Unlock1.0 घाम फोडणार! डिझेल पहिल्यांदाच 80 पार; महागाई वाढणार

 

 

Read in English

Web Title: Coronil: Maharashtra won't allow sale of Coronil spurious medicine: Anil Deshmukh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.