Coronavirus: आमदाराच्या नावे फेक अकाउंट बनवून कोरोनाची पसरवली अफवा; पोलिसात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2020 11:23 AM2020-03-21T11:23:13+5:302020-03-21T11:36:58+5:30

आमदार लहामटे यांनी याप्रकणी पोलिसात तक्रार दिली आहे.

Corono rumors spread through MLA fake account | Coronavirus: आमदाराच्या नावे फेक अकाउंट बनवून कोरोनाची पसरवली अफवा; पोलिसात गुन्हा दाखल

Coronavirus: आमदाराच्या नावे फेक अकाउंट बनवून कोरोनाची पसरवली अफवा; पोलिसात गुन्हा दाखल

Next

मुंबई : कोरोनोच्या पार्श्वभूमीवर अफवा पसरवणारे मेसेज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर वायरल होत आहेत. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. तर अकोले विधानसभा मतदार संघाचे आमदार किरण लहामटे यांच्या नावाच्या फेक अकाउंटवरून कोरोनाबाबतची अफवा पसरवणाऱ्या पोस्ट शेयर करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

आमदार लहामटे यांनी याप्रकणी पोलिसात तक्रार दिली आहे. ज्यात त्यांनी म्हंटलं आहे की, माझे स्वता:चे नावे कोणतेही अधिकृत ट्वीटर अकाऊंट नाही. असे असतानाही माझ्या नावाचे कोणीतरी अज्ञात व्यक्तीने खोटे अकाऊंट खोलून, कोरोनोबाबत चुकीची माहिती पोस्ट करून अफवा पसरवण्याच काम करत आहे. त्यामुळे याची तातडीने चौकशी करण्याची मागणी आमदार लहामटे यांनी केली आहे.

आमदार लहामटे यांच्या फेक ट्वीटर अकाऊंटवरून अकोल्यात कोरोनोचा १ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आला असल्याची खोटी महिती पोस्ट करण्यात आली होती. तसेच अकोला तालुका बंद करण्यात आला असल्याचा सुद्धा यात उल्लेख करण्यात आला होता. मात्र ही फक्त अफवा असून, माझ्या नावाचे फेक अकाऊंट तयार करण्यात आल्याची माहिती आमदार लहामटे यांनी दिली आहे.

राज्यात ११ नवे रुग्ण आढळल्याने कोरोना रुग्णांची संख्या ६३ झाली आहे. ज्यात दहा मुंबईचे व एक रुग्ण पुण्याचा आहे. तर ६३ पैकी १३ ते १४ रुग्णांना संपर्कातून कोरोना झाल्याचे स्पष्ट झालं असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

 

Web Title: Corono rumors spread through MLA fake account

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.