लोटस बिझनेस स्कूलमध्ये कॉर्पोरेट लीडरशिप प्रोग्राम
By admin | Published: July 14, 2015 12:37 AM2015-07-14T00:37:27+5:302015-07-14T00:37:27+5:30
लोटस बिझनेस स्कूल व शिव खेरा इन्स्टिट्यूट आॅफ लीडरशिप मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने नेतृत्व कौशल्याच्या विकासासाठी नुकतीच ‘कॉर्पोरेट लीडरशिप प्रोग्राम’ची घोषणा
औरंगाबाद : लोटस बिझनेस स्कूल व शिव खेरा इन्स्टिट्यूट आॅफ लीडरशिप मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने नेतृत्व कौशल्याच्या विकासासाठी नुकतीच ‘कॉर्पोरेट लीडरशिप प्रोग्राम’ची घोषणा करण्यात आली. या प्रोग्रामच्या निमित्ताने आजच्या तरूण पिढीत नेतृत्वगुण निर्माण करून त्यांना विकसित करणारे एक विश्वसनीय व्यासपीठ तयार करणे हा यामागचा व्यापक उद्देश आहे.
उद्योग, तसेच व्यवस्थापन क्षेत्रातील बिझनेस मॅनेजर लोकांमध्ये आजकाल ठळकपणे आढळून येणारा नेतृत्वगुणांचा अभाव या समस्येचे निवारण करण्यासाठी लोटस बिझनेस स्कूलचे नुकताच लेखक, प्रशिक्षण व व्यापार सल्लागार शिव खेरा यांच्या इन्स्टिट्यूट आॅफ लीडरशिप मॅनेजमेंट सोबत सामंजस्य करार केला आहे.
लोटस बिझनेस स्कूलचे संचालक चारुदत्त बोधनकर म्हणाले की, आज एमबीए उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुणांचा मोठ्या प्रमाणात अभाव आढळतो. शिव खेरा यांचा नेतृत्व गुण या विषयावर सखोल अभ्यास आहे. ते स्वत: मार्गदर्शन करणार असल्याने यांचा विद्यार्थ्यांना मोठा फायदा होईल. हा प्रोग्राम शिकण्याची संधी मिळून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना शिव खेरा इन्स्टिट्यूटतर्फे प्रमाणपत्रही मिळणार आहे. (वाणिज्य वार्ता)