महामंडळाच्या गाड्यांचा राजकारण्यांना लाभ!

By Admin | Published: August 7, 2015 01:26 AM2015-08-07T01:26:40+5:302015-08-07T01:26:40+5:30

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या पैशातून कोट्यवधी रुपये किमतीच्या ६४ गाड्यांचे नियमबाह्ण वाटप करण्यात आले. त्यात काही सामाजिक

Corporations benefit from corporations! | महामंडळाच्या गाड्यांचा राजकारण्यांना लाभ!

महामंडळाच्या गाड्यांचा राजकारण्यांना लाभ!

googlenewsNext

यदु जोशी, मुंबई
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या पैशातून कोट्यवधी रुपये किमतीच्या ६४ गाड्यांचे नियमबाह्ण वाटप करण्यात आले. त्यात काही सामाजिक कार्यकर्ते, राष्ट्रवादीचे नेते आणि भाजपा नेत्यांच्या नातेवाइकांचाही समावेश आहे.
वार्षिक एक लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्या व्यक्तींना व्यवसाय सुरू करण्यासाठी वाहने कर्जाऊ देण्याची महामंडळाची योजना आहे. या योजनेचे नियम/निकष धाब्यावर बसवून रमेश कदम महामंडळाचा अध्यक्ष असताना ६४ गाड्या वाटण्यात आल्या. त्यासाठी कोणतेही कर्जप्रकरण करण्यात आली नाहीत. कराड येथील एका प्राध्यापक महोदयांना इनोव्हा गाडी देण्यात आली.
रमेश कदमचे जवळचे असलेले सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बळीराम काका साठे यांच्या दिमतीला असलेली एक इनोव्हा गाडी महामंडळाच्या पैशातूनच घेण्यात आली होती. ती आता पोलिसांना परत करण्यात आली आहे.
पुणे जिल्ह्णातील राष्ट्रवादीचे एक माजी राज्यमंत्री रमेश कदमच्या कृपेने दुसऱ्याच्या नावावर मिळालेली गाडी दोन वर्षे वापरत होते. चार दिवसांपूर्वी या गाडीचे २० लाख रुपये महामंडळात जमा करण्यात आले.
लातूर जिल्ह्णातील भाजपाचे माजी आमदार टी.पी.कांबळे यांचे पुत्र राजू कांबळे यांना इनोव्हा गाडी मिळाली. टी.पी.कांबळेंच्या दुसऱ्या मुलाला ट्रॅक्टर मिळाले. तिसरे पुत्र संजय हे महामंडळाचे लातूर जिल्हा व्यवस्थापक आहेत.
महामंडळाच्या मुंबई मुख्यालयातील अधिकाऱ्यांनी लोकमतला सांगितले की, कांबळे यांना देण्यात आलेल्या गाडीबाबत विभागीय व्यवस्थापकांचा
चौकशी अहवाल आमच्याकडे
आला असून ही गाडी नियमबाह्ण पद्धतीने दिल्याचे त्यात म्हटले
आहे. याच अहवालात ट्रॅक्टरबाबतचाही उल्लेख आहे. टी.पी.कांबळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, आपल्या मुलांना नियमानुसारच वाहने मिळाल्याचा दावा केला.
महामंडळाच्या सहा जिल्हा कार्यालयांमधून आरटीजीएस आणि बेअरर चेकद्वारे ८६ कोटी रुपये काढण्यात आले असून ही अख्खी रक्कम गायब असल्याचे वृत्त लोकमतने सर्वप्रथम दिले होते. त्यानुसार या सहा जिल्ह्णांमधील अधिकारी़/ कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र, त्यापैकी कोणालाही अद्याप अटक करण्यात आलेली नाही.
महागाई भत्ताही हडप
साठे महामंडळातील कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याची २ कोटी ४ लाख रुपयांची थकबाकी द्यावयाची होती. कदमचा विश्वासू आणि त्याचा पीए विजय कसबे याने कर्मचाऱ्यांना दमदाटी करून त्यातील १ कोटी २ लाख रुपये वसूल केले, असा कर्मचाऱ्यांचा आरोप आहे.
८० लाखांचा भूखंड १८ लाखांत दिला कसा?
महामंडळाच्या मालकीचा असलेला नाशिकच्या अंबड औद्योगिक वसाहतीतील भूखंडाची किंमत ६८ लाख रुपये होती. त्यावर संरक्षक भिंतीसह १२ लाख रुपयांची कामे महामंडळाने केलेली होती. ८० लाख रुपयांचा हा भूखंड व्हिजन टेक एंटरप्रायजेसला केवळ १८ लाख रुपयात विकण्यात आला. विशेष म्हणजे हे १८ लाख रुपयेही महामंडळातूनच देण्यात आले. आता हा भूखंड महामंडळाला परत मिळावा यासाठी महामंडळ न्यायालयात धाव घेणार आहे.

Web Title: Corporations benefit from corporations!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.