महामंडळाचे धान्य गोदाम कोसळले
By admin | Published: August 4, 2016 02:31 AM2016-08-04T02:31:17+5:302016-08-04T02:31:17+5:30
तलासरी येथे असलेले महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाचे धान्य गोदाम सततच्या पावसामुळे कोसळले
तलासरी : तलासरी येथे असलेले महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाचे धान्य गोदाम सततच्या पावसामुळे कोसळले असून महामंडळाने खरेदी केलेला धान्यापैकी अडीच टन धान्य पावसाच्या पाण्यात भिजले आहे. या वेळी घेतलेल्या दक्षतेमुळे उर्वरित धान्य वाचविण्यात यश आले.
आदिवासी विकास महामंडळ तलासरी भागात शेतकऱ्याकडून एकाधिकार भातखरेदी करते. परंतु हे धान्य ठेवायला महामंडळाकडे जागा नसल्याने महामंडळाने आदिवासी सेवा सोसायटीची गोदामे भाड्याने घेतली आहेत. परंतु ही शासनजमा असलेली गोदामांची नादुरुस्त असल्याने ती कोसळावयास आली आहेत. परंतु नाइलाजास्तव महामंडळाला या धोकादायक धान्य गोदामातच धान्य ठेवावे लागते. तलासरी येथे खरेदी केलेले आठशे क्विंटल धान्य तलासरी येथील धान्य गोदामात ठेवण्यात आले होते. गोदाम गळत असल्याने या धान्यावर प्लास्टिक टाकण्यात आले होते. (वार्ताहर)