नगरसेवकाची अभियंत्याला मारहाण
By admin | Published: May 20, 2016 02:43 AM2016-05-20T02:43:26+5:302016-05-20T02:43:26+5:30
अभियंत्याला मारहाण झाल्याचे तीव्र पडसाद गुरुवारी उमटले़ जी उत्तर विभाग कार्यालयातील कामगार, कर्मचारी, अभियंत्यांनी या घटनेच्या निषेधार्थ कामबंद आंदोलन पुकारले़
मुंबई : नालेसफाईवरून अभियंत्याला मारहाण झाल्याचे तीव्र पडसाद गुरुवारी उमटले़ जी उत्तर विभाग कार्यालयातील कामगार, कर्मचारी, अभियंत्यांनी या घटनेच्या निषेधार्थ कामबंद आंदोलन पुकारले़ अशा प्रकरणात संबंधितांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्याचा निर्णय अखेर पालिका प्रशासनाने घेतला आहे़
शिवसेना नगरसेवक राजेंद्र सूर्यवंशी यांनी अभियंता प्रीतम वनारसे यांना जी उत्तर विभागातील सहायक आयुक्तांसमोरच मारहाण केली़ या प्रकरणी वनारसे यांनी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात नगरसेवकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़
डॉक्टरांप्रमाणेच अभियंत्यांनाही कायद्याचे संरक्षण मिळावे़ अभियंत्यांना मारहाण हा अजामीनपात्र गुन्हा असल्याचे जाहीर करावे, अशी मागणी अभियंत्यांच्या संघटना अनेक वर्षांपासून करीत आहेत़ बुधवारी घडलेल्या मारहाणीच्या घटनेनंतर प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली आहे़ (प्रतिनिधी)
>राज्य सरकारही अनुकूल
स्वाधीन क्षत्रिय पालिका आयुक्त असताना त्यांनी अशा प्रकरणांत अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती़ मुख्यमंत्र्यांनी नगर विकास खात्यालाही याबाबत सूचित केले होते, असे अभियंता जॉइंट अॅक्शन कमिटीचे पदाधिकारी साईनाथ राजाध्यक्ष यांनी सांगितले़