शौचालयाच्या बांधणीवरून नगरसेवकाने केली मारहाण

By admin | Published: June 29, 2016 02:17 AM2016-06-29T02:17:41+5:302016-06-29T02:17:41+5:30

स्वच्छ भारत अभियान अंतर्गत पनवेल नगर परिषदेतर्फे बांधण्यात येत असलेल्या शौचालयावरून मारामारी होऊन त्याबाबतची तक्रार कामोठे पोलीस ठाण्यात करण्यात आली

Corporators killed the toilets | शौचालयाच्या बांधणीवरून नगरसेवकाने केली मारहाण

शौचालयाच्या बांधणीवरून नगरसेवकाने केली मारहाण

Next


पनवेल : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत पनवेल नगर परिषदेतर्फे बांधण्यात येत असलेल्या शौचालयावरून मारामारी होऊन त्याबाबतची तक्रार कामोठे पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
धाकटा खांदा गावातील सर्व्हे नंबर ४९५ मधील भूखंड संजय कमलाकर पाटील यांच्या मालकीचा असून ही जागा सिडकोने संपादित केली. परंतु या जागेचा मोबदला सिडकोने प्रकल्पग्रस्ताला दिला नाही. त्यातच याठिकाणी नगरपरिषद शौचालय बांधणार असल्याची कुणकुण पाटील व त्यांच्या कुटुंबीयांना लागली होती. जागेचा वाद पनवेल न्यायालयात प्रलंबित आहे मात्र तरी देखील स्थानिक नगरसेवक गणपत हशा म्हात्रे यांच्या सांगण्यानुसार शौचालय बांधण्याचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी संजय कमलाकर पाटील यांनी जाब विचारला असता, गणपत म्हात्रे, शैलेश दत्तात्रेय म्हात्रे व भगवान काथोड पाटील यांनी मारहाण केली. शिवीगाळ व दमदाटी देखील केली.

Web Title: Corporators killed the toilets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.