‘कॉरिडॉरमधून कोल्हापूरला वगळलेले नाही’
By admin | Published: September 22, 2016 05:01 AM2016-09-22T05:01:06+5:302016-09-22T05:01:06+5:30
मुंबई - बंगलोर कॉरिडॉरसाठी कोल्हापुरातून सुमारे चार हजार एकर जमीन लागेल.
सतीश पाटील,
कोल्हापूर- मुंबई - बंगलोर कॉरिडॉरसाठी कोल्हापुरातून सुमारे चार हजार एकर जमीन लागेल. ही जमीन जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार आणि उद्योजकांनी एकत्र येऊन उपलब्ध करून दिली, तर कॉरिडॉरबाबत कोणतीही अडचण नाही. कॉरिडॉरचा अजून कोणताही मार्ग निश्चित झालेला नाही. शिवाय कोल्हापूरला वगळले नाही, असे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी बुधवारी सांगितले.
उद्योगमंत्र्यांच्या मंत्रालयातील दालनात बैठक झाली. यामध्ये जिल्ह्यातील सर्वच आमदारांनी मुंबई-बंगलोर कॉरिडॉर, कऱ्हाड-बेळगाव रेल्वेमार्ग हे कोल्हापुरातून जावेत, अशी मागणी केली. त्यानंतर उद्योजकीय संघटनांच्या बैठकीत शिरोली मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुरेंद्र जैन यांनी कोल्हापूरला शिरोली, गोकुळ शिरगांव आणि कागल-हातकणंगले पंचतारांकित या तीन औद्योगिक वसाहती आहेत. मात्र, येथे मोठा उद्योग नाही. कॉरिडॉरच्या माध्यमातून मोठे उद्योग येतील. त्यामुळे कॉरिडॉर कोल्हापुरातून जावा, अशी मागणी केली.