मी २५ दिले होते, ५० महाजनला द्यायला सांगितलेत; RTO घोटाळ्याचा VIDEO व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2021 10:58 AM2021-06-23T10:58:19+5:302021-06-23T11:28:00+5:30

नंदूरबारचे डेप्युटी आरटीओ नानासाहेब बच्छाव यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

corruption in rto caught on camera video of senior officer goes viral | मी २५ दिले होते, ५० महाजनला द्यायला सांगितलेत; RTO घोटाळ्याचा VIDEO व्हायरल

मी २५ दिले होते, ५० महाजनला द्यायला सांगितलेत; RTO घोटाळ्याचा VIDEO व्हायरल

googlenewsNext

मुंबई- राज्याच्या प्रादेशिक परिवहन विभागात भ्रष्टाचार व अनागोंदी कारभार होत असल्याच्या प्राप्त झालेल्या तक्रारीने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. मात्र नाशिक पोलिसांच्या चौकशीअंती याबाबतचा कुठल्याही प्रकारचा गुन्हा शहर आयुक्तालयाच्या हद्दीत घडला नसल्याचे प्रशासनाने मंगळवारी (दि.22) स्पष्ट केले आहे. नाशिक पोलिसांनी आरटीओ घोटाळ्याबाबत त्यांच्या हद्दीपुरती क्लीन चिट दिलेली असतानाच आता एक व्हिडिओ समोर आला आहे. 

नंदूरबारचे डेप्युटी आरटीओ नानासाहेब बच्छाव टेबलवर मोठी रक्कम ठेवून बोलत काही जणांशी बोलत असतानाचा हा व्हिडिओ आहे. कनिष्ठ आरटीओ खडसे आणि भोई यांच्याकडून पैशाचा कथित हिशोब ते मागत असल्याचे दिसते. बच्छाव यांनी तो पैसा स्वीकारलेला नाही, पण १० लाख रुपयांची मागणी करताना दिसतात. हा व्हिडिओ दीड वर्षापूर्वीचा असला तरी आरटीओतील घोटाळ्यांच्या निमित्ताने त्याची चर्चा सुरू झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा व्हिडिओ त्यांच्याच एका सहकाऱ्याने तयार केला होता. 'हा व्हिडिओ म्हणजे माझ्याविरुद्धचा कट आहे. तो मोडूनतोडून तयार केलेला आहे', असे बच्छाव यांचे म्हणणे आहे.

परिवहन मंत्री अनिल परबांसह अधिकाऱ्यांना दिलासा
राज्याच्या मंत्र्यांपासून उच्चपदस्थ अधिकारी वर्गांपर्यंत भ्रष्टाचाराचे आरोप करणारी तक्रार आरटीओचे निलंबित मोटार निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात दिली होती. या तक्रारीची गंभीरपणे दखल घेत पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी गुन्हे शाखेचे उपायुक्त संजय बारकुंड यांना चौकशी अधिकारी म्हणून नियुक्त करत सखोल चौकशीचे आदेश दिले होते. 27 मे पासून याप्रकरणी चौकशीला सुरुवात झाली होती. दोनदा मिळालेल्या मुदतवाढीनंतर गुन्हे शाखेने पंधरवड्यात चौकशी पूर्ण केली आहे. या दरम्यान राज्याच्या अवर सचिव, उपसचिवांपासून नाशिक, धुळे, जळगाव आदी जिल्ह्यातील प्रादेशिक परिवहन अधिकारी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, मोटार वाहन निरीक्षक, आरटीओची कामे करणारे खासगी व्यक्ती आणि तक्रारदार असे सुमारे 35पेक्षा अधिक लोकांची कसून चौकशी करण्यात आली. सुरुवातीपासून यामध्ये क्लिष्टता, गुंतागुंत आढळून येत होती.

Web Title: corruption in rto caught on camera video of senior officer goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.