कोथिंबीर जुडी 65 रुपये
By admin | Published: July 23, 2014 11:16 PM2014-07-23T23:16:51+5:302014-07-23T23:16:51+5:30
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मेथी व कोथिंबीर यांचे बाजारभाव कडाडले आहेत. कोथिंबीर एक जुडी तब्बल 65 रुपयांना विकली गेल्याची माहिती सचिव दिलीप ढमढेरे यांनी दिली.
Next
मंचर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मेथी व कोथिंबीर यांचे बाजारभाव कडाडले आहेत. कोथिंबीर एक जुडी तब्बल 65 रुपयांना विकली गेल्याची माहिती सचिव दिलीप ढमढेरे यांनी दिली.
मेथी, कोथिंबीर यांचे बाजारभाव मागील एक महिन्यापासून वाढले आहेत. आंबेगाव तालुक्यातील अनेक शेतकरी या पिकांचे उत्पादन घेतात. कमी दिवसात व कमी खर्चात येणा:या या पिकाचे उत्पादन पाणी उपलब्ध असलेल्या ठिकाणी घेतले जाते. या वर्षी पावसाने ओढ दिल्याने मेथी, कोथिंबीर यांचे कमी उत्पादन निघत आहेत. वास्तविक पाहता जुलै महिन्यात यापूर्वी जास्त उत्पादन निघत असल्याचा अनुभव आहे. मात्र, पावसाअभावी उत्पादन घटल्याने बाजारभाव कडाडले आहेत. (वार्ताहर)
4मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी मेथीच्या 33,148 जुडय़ांची आवक होऊ न त्यास शेकडा 3क्1 ते 1751 रुपये, असा बाजारभाव मिळाला.
4कोथिंबिरीच्या 29213 जुडय़ांची आवक होऊ न त्यास शेकडा 4क्1 ते 5551 रुपये, असा बाजारभाव मिळाला आहे. या बाजारभावाने शेतकरी समाधान व्यक्त करीत आहेत. मिळणारा बाजारभाव हा चांगल्या व सुकलेल्या मालास मिळतो.
4ओला माल असल्यास खरेदीदार तो घेण्यास टाळाटाळ करतात; कारण पावसाने भिजलेली मेथी कोथिंबीर मुंबईला जाईर्पयत टिकाव धरत नाही.
4त्यामुळे तिला कमी बाजारभाव मिळतो. यापुढील काळात मेथी, कोथिंबिरीची आवक वाढण्याची
शक्यता आहे.