कॉसमॉसच्या संचालक मंडळाची निवडणूक रविवारी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2019 09:08 PM2019-12-19T21:08:52+5:302019-12-19T21:10:16+5:30
दि कॉसमॉस को-ऑपरेटीव्ह बँकेच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक
पुणे : दि कॉसमॉस को-ऑपरेटीव्ह बँकेच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक येत्या रविवारी (दि. २२) होत आहेत. उत्कर्ष व सहकार पँनेलमधे ही लढत होईल. विद्यमान अध्यक्ष व विद्यमान संचालकांमधे ही लढत होणार असून, या निवडणुकीत राज्याचे माजी सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. महाराष्ट्रासह सात राज्यातील तब्बल ५९ हजार मतदार मतदानाचा हक्क बजावतील.
उत्कर्ष पॅनेलमधे बँकेचे विद्यमान अध्यक्ष सीए मिलिंद काळे आणि माजी अध्यक्ष तथा बँकींग तज्ज्ञ डॉ. मुकुंद अभ्यंकर यांच्यासह चार सीए आणि एकूण १३ सदस्य रिंगणात आहेत. त्यांचे मतदान चिन्ह रोडरोलर आहे. तर, सहकार पॅनेलमधे बँकेचे माजी अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांच्यासह सहा विद्यमान संचावलक निवडणूक रिंगणात आहेत. तसेच, राज्याचे माजी सहकार आयुक्त दळवी आणि इतर पाच व्यक्ती या पॅनलमधे आहेत. सहकार पॅनेलचे निवडणूक चिन्ह टेलिफोन आहे.
बँकेच्या पुण्यासह गुजरात, मध्यप्रदेश, तेलंगणा, आंध्रप्रदेश, तामिळनाडू आणि कर्नाटक या राज्यात शाखा आहेत. बँकेचे एकूण ८० हजार सभासद असून, त्यातील ५९ हजार जणांना मतदानाचा अधिकार आहे. त्यातील ३६ हजार सभासद पुणे आणि ८ हजार उर्वरीत राज्यात आहेत. तर, परराज्यातील सभासद मतदारांची संख्या १५ हजार आहे.
---
मतदान केंद्र
अप्पा बळवंत चौकातील नू. म. वि प्राथमिक शाळा आणि नू. म. वि. प्रशाला, आळंदी येथील जुन्य बस स्टँट समोरील बँकेची शाखा, चिंचवडमधील जयश्री सिनेमागृहा जवळील श्री अग्रेसन भवन येथे २२ डिसेंबरला सकाळी ९ ते सायंकाळी सहा या वेळेत मतदान होईल. उर्वरीत ठिकाणी बँकेच्या शाखांमधे मतदानाची सोय करण्यात आली आहे.
--
उत्कर्ष पॅनेल -निवडणूक चिन्ह : रोडरोलर, उमेदवार : डॉ. मुकुंद अभ्यंकर, मिलिंद काळे, अॅड. प्रल्हाद कोकरे, यशवंत कासार, सचिन आपटे, अजित गिजरे, मिलिंद पोकळे, राजेश्वरी धोत्रे, जयंत बर्वे, प्रवीणकुमार गांधी, नंदकुमार काकिर्डे, अरविंद तावरे, अॅड. अनुराधा गडाळे.
सहकार पॅनेल-निवडणूक चिन्ह : टेलिफोन, उमेदवार : कृष्णकुमार गोयल, गोविंद क्षीरसागर, स्मिता जोग, दिपेंद्र शहा, श्रीपाद पंचपोर, जयंत शाळीग्राम, राजीव साबडे, चंद्रकांत दळवी, अमरनाथ चक्रदेव, मुकेश शहा, योगेश भोकरे, बाळकृष्ण भोसले, सतीश दराडे.