एसी बसची भाडेनिश्चिती रखडली

By admin | Published: May 18, 2016 03:58 AM2016-05-18T03:58:24+5:302016-05-18T03:58:24+5:30

मीरा-भाईंदर महापालिकेच्या परिवहन विभागाच्या वातानुकूलित (एसी) बसच्या तिकीट भाड्याला मान्यता मिळावी

The cost of AC bus was fixed | एसी बसची भाडेनिश्चिती रखडली

एसी बसची भाडेनिश्चिती रखडली

Next


भार्इंदर : मीरा-भाईंदर महापालिकेच्या परिवहन विभागाच्या वातानुकूलित (एसी) बसच्या तिकीट भाड्याला मान्यता मिळावी, यासाठी पालिका अडीच वर्षांपासून प्रादेशिक परिवहन विभागाकडे पाठपुरावा करत आहे. परंतु, त्याला अजूनही मान्यता न मिळाल्याने तो प्रादेशिक परिवहनच्या लालफितीतच अडकल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे ताफ्यात येऊ घातलेल्या वातानुकूलित बस प्रवाशांना कधी मिळतील हा प्रश्नच आहे.
पालिकेने २००५ पासून सुरू केलेल्या परिवहन सेवेसाठी प्रथमच १० वातानुकूलित बस खरेदी करण्यात आल्या आहेत. त्याची निर्मिती सध्या पूर्ण झाली आहे. त्यातील पाच बसच सुरुवातीला ताफ्यात दाखल होतील. या बस येण्याच्या मार्गावर असतानाच त्याला विधान परिषद निवडणूक आचारसंहितेचे गालबोट लागल्याने त्या सध्या कंपनीत उभ्या आहेत. परंतु, या बस सेवेत दाखल होण्यापूर्वी त्यांच्या तिकिटाचे भाडे निश्चित होणे अपेक्षित आहे. त्याला प्रादेशिक परिवहनची मान्यता आवश्यक असल्याने परिवहनने ३ सप्टेंबर २०१४ पासून प्रादेशिक परिवहनकडे तिकीट दराचा प्रस्ताव पाठविण्यास सुरुवात केली आहे. परंतु, त्याला अजूनही मान्यता मिळालेली नाही. (प्रतिनिधी)
>...तर बदल होण्याची शक्यता
शहरातील अधिकाधिक प्रवासी मुंबई व ठाणे येथे प्रवास करतात. वातानुकूलित बसमधून ठाण्याला जाण्यासाठी त्यांना किमान ९० ते १०० रुपये मोजावे लागणार आहेत. परंतु, त्यात प्रादेशिक परिवहन विभागाने बदल केल्यास दर कमी-अधिक होण्याची शक्यता पालिकेच्या परिवहन विभागाने वर्तविली जात आहे.
बस कंपनीतच उभ्या
प्रशासनाने सुरुवातीला पाच वातानुकूलित बस सेवेत समाविष्ट करण्याचे ठरवले आहे. सध्या त्या आचारसंहितेमुळे कंपनीतच उभ्या आहेत, असे परिवहन विभागाकडून सांगण्यात आले. या बस ठाणे, मुंबई, विमानतळ, नवी मुंबई आदी लांब पल्ल्यांच्या मार्गावर चालवण्यात येणार आहेत.
>भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेच्या परिवहन सेवेच्या ताफ्यात १० वातानुकूलित बस दाखल होणार होत्या. त्याची प्रक्रियाही पूर्ण झाली होती. मात्र, विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने या बसचे आगमन लांबणीवर पडले आहे.
>महापालिकेने १०० बसपैकी २८ बस २४ आॅक्टोबरपासून प्रवेशाच्या सेवेत दाखल केल्या आहेत. मात्र, तांत्रिक बिघाडामुळे प्रत्यक्षात २५ बसच रस्त्यावर धावत आहेत. त्यानंतर, १६ एप्रिलला आणखी १५ बस सेवेत दाखल झाल्या. या बसची नोंदणी प्रक्रिया अजूनही पूर्ण न झाल्याने त्या परिवहन सेवेला रस्त्यावर आणता आल्या नाहीत.
>उर्वरित ६० पैकी १० बस मिनी तर ४० बस स्टॅण्डर्ड पद्धतीच्या आहेत. यंदा प्रथमच प्रशासनाने १० वातानुकूलित बस खरेदी केल्या आहेत. त्याची निर्मिती बस कंपनीने केली आहे. या बस सेवेत दाखल करण्यासाठी प्रशासनानेही आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण केली. परंतु, त्या रस्त्यावर आणण्यापूर्वीच विधान परिषदेची निवडणूक जाहीर झाली. आचारसंहितेमुळे प्रवाशांना आरामदायी प्रवासासाठी वातानुकूलित बसची आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Web Title: The cost of AC bus was fixed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.