आयटी इंडस्ट्रीवर कॉस्ट कटिंगची टांगती तलवार
By Admin | Published: July 5, 2016 06:55 PM2016-07-05T18:55:52+5:302016-07-05T18:55:52+5:30
आयटी इंडस्ट्रीमध्ये काम करणा-यांसाठी अत्यंत खेदजनक बातमी समोर आली आहे.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि.. 5- आयटी इंडस्ट्रीमध्ये काम करणा-यांसाठी अत्यंत खेदजनक बातमी समोर आली आहे. आयटीमध्ये पुढच्या 5 वर्षांत 6.4 लाख नोक-यांवर कु-हाड चालण्याची शक्यता एका सर्वेक्षणातून व्यक्त करण्यात आली आहे. अमेरिकेतील HFC या रिसर्च संस्थेच्या सर्वेक्षणानुसार, देशात आजमितीस आयटी क्षेत्रात ३.५ मिलियन तरुण कार्यरत आहेत.
भारतातल्या आयटी इंडस्ट्रीतल्या कंपन्या आर्थिक बोझ्याखाली दबल्या गेल्या आहेत. त्यामुळे आगामी काळात जवळपास या कंपन्या ६.४ लाखांच्या आसपास नोकऱ्यांमध्ये कपात करण्याची भीती व्यक्त करण्यात येते आहे. जगभरात ऑटोमॅटिक टेक्नॉलॉजीचा झपाट्यानं प्रभाव वाढत असल्यानं आयटी इंडस्ट्रीतल्या अनेक नोकरदार तरुणांवर बेरोजगार होण्याची वेळ येणार आहे. HFC रिसर्च संस्थेचे सीईओ फिल फ्रेस्टने यांच्या माहितीनुसार, गेल्या दोन दशकांमध्ये भारताच्या आयटी क्षेत्रात मोठ्या तेजीचं वातावरण निर्माण झालं आहे. मात्र याच क्षेत्रावर मंदीचे सावट असल्याने भारतीय आयटी कंपन्यांमधून कर्मचारी कपात करण्यात येऊ शकते. लो स्किल जॉब 30 टक्के, मीडियम स्किल जॉब 8 टक्क्यांपर्यंत कपात होणार आहे. तर या उलट हाय स्किल जॉबमध्ये 56 टक्क्यांची वाढ होणार असल्याचं या सर्वेक्षणातून स्पष्ट करण्यात आलं आहे.